नवरात्र आणि दसरा जवळ येत असून, देशभरात रामलीलेची तयारी जोरात सुरू आहे.21 सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सव सुरू होत आहे. रामलीलाही याच दिवशी सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी पात्रांची निवड केली जात आहे. दिल्लीतील लवकुश रामलीला नेहमीच भव्य दिव्य असतं. मात्र, यावेळी रामलीला सुरू होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. रामलीलेमध्ये मंदोदरीची (Mandodari)भूमिका अभिनेत्री पूनम पांडे साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.या घोषणे नंतरच वाद निर्माण झाला आहे. साधू आणि संतांनी या निवडीला तीव्र विरोध केला आहे.

अयोध्येतील संतांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विश्व हिंदू परिषदेने देखील रामलीला समितीला पत्र लिहून आपला आक्षेप नोंदवला आहे.संत दिवाकराचार्य जी महाराजांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, “मी त्यांची नावे सांगू इच्छित नाही. अशा लोकांकडून सादर होणारी रामलीला बघणाऱ्यांना हिंदू समाज स्वीकारणार नाही. अशा लोकांना व्यासपीठावर बंदी घातली पाहिजे; आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. ही रामलीला नाही; हा हिंदू धर्म आणि आपल्या सनातन धर्माविरुद्ध एक कट आहे.”
पुढे त्यांनी म्हटले आहे की राणी मंदोदरी रावणाची पत्नी होती आणि तिच्या सती व्रत आणि पती व्रत कधीही तडजोड केली गेली नाही.रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा मंदोदरीने रावणाला विरोध केला. मंदोदरी साकारणारी व्यक्ती शरीराने आणि मनाने शुद्ध असली पाहिजे. मंदोदरी साकारणाऱ्या पूनम पांडेचे नाव न घेता दिवाकराचार्य म्हणाले की ती पैसे कमविण्यासाठी आपले शरीर विकते.

हनुमानगढीचे संत डॉ. देवेशचार्य यांनीही रामलीलेतील पूनम पांडेच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यांनी पूनम पांडेला बाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्यांनी पूनम पांडेला एक असभ्य महिला देखील म्हटले आहे. संतांनी लव कुश रामलीला समितीला पूनम पांडेला ताबडतोब रामलीलेतून बाहेर काढण्याची विनंती केली. अन्यथा, लव कुश रामलीला समितीला रामलीलेविरुद्ध निषेधांना सामोरे जावे लागू शकते(Mandodari).
हेही वाचा :
‘…तर तुझी चड्डी सुद्धा ठेवणार नाही’; शिवाजी वाटेगावकरांचा पडळकरांना थेट इशारा
भारत-पाक पुन्हा आमनेसामने, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इचलकरंजी : कबनूर येथे पतीपत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला