आजच्या डिजिटल युगात आधार कार्डशिवाय(Aadhaar card) कोणतेही काम शक्य नाही. बँक खाते उघडणे, मोबाईल सिम घेणे, शाळा-कॉलेज प्रवेश किंवा सरकारी योजनांचा लाभ घेणे – सर्व ठिकाणी आधार अनिवार्य आहे. पण आधारसंबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास आता मोठी शिक्षा भोगावी लागू शकते. UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने याबाबत कडक नियम लागू केले असून, चुकीची माहिती देणे किंवा गैरवापर करणे गंभीर गुन्हा मानला जाईल.

चुकीची माहिती दिल्यास तुरुंगवास :
जर कोणी आधार कार्डसाठी(Aadhaar card) अर्ज करताना खोटी किंवा चुकीची माहिती सादर केली, तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ₹10,000 पर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे अर्ज करताना नेहमी सत्य माहिती आणि योग्य कागदपत्रेच द्यावीत, असा UIDAI चा सल्ला आहे.
दुसऱ्या व्यक्तीच्या आधारमध्ये बदल करणे, छेडछाड करणे किंवा अनधिकृत माहिती घेणे हा गुन्हा मानला जातो. यासाठीही 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा ₹10,000 पर्यंत दंड होऊ शकतो. आधार हा वैयक्तिक ओळखीचा दस्तऐवज असल्याने परवानगीशिवाय त्यात बदल करणे धोकादायक ठरू शकते.
डेटा लीक केल्यास मोठा दंड :
UIDAI च्या परवानगीशिवाय आधारसंबंधित माहिती उघड करणे, गोळा करणे किंवा लीक करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात 3 वर्षांचा तुरुंगवास आणि ₹10,000 दंड होतो. एखाद्या कंपनीने असे केल्यास तिला तब्बल ₹1 लाख दंड भरावा लागू शकतो. नागरिकांच्या गोपनीयतेशी संबंधित कोणतीही माहिती गैरवापरासाठी दिल्यास कायदेशीर कारवाई अपरिहार्य आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, जर कोणी आधार केंद्रावर हॅकिंग केलं किंवा डेटा चोरीचा प्रयत्न केला, तर त्याला थेट 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ₹10,000 ते ₹10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. UIDAI ने या संदर्भात स्पष्ट इशारा दिला असून, अशा प्रकारांना शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल.
हेही वाचा :
नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा पचायला हलका आणि पौष्टिक पदार्थ
ग्राहकांचे बजेट बिघडणार का? सोन्या-चांदीच्या किमती पुन्हा उंचावल्या, खरेदीदारांचे हाल!
आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर….