भारतातील प्रसिद्ध गायक कुमार सानू(kumar sanu) यांच्या पहिल्या पत्नी रीता भट्टाचार्य यांनी नुकताच एका मुलाखत धक्कादायक खुलासे केले आहेत. रीता यांनी कुमार सानूच्या कुटुंबाचा या मुलाखतीत पर्दाफाश केला आहे. नवरा, नंणद, कुमार सानूचा भाऊ, वडील आणि भाचीबद्दल अनेक गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. कुमार सानूसह त्यांच्या कुटुंबाच्या चारित्र्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहेत. फिल्म विंडोला दिलेल्या मुलाखतीत रीता यांनी केवळ कुमार सानूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खळबळजनक खुलासे केले आहेत.

रीता यांनी मुलाखात असा आरोप केला आहे की, कुमार सानूच्या (kumar sanu)कुटुंबाचा लग्न आणि नातेसंबंधांबद्दल खूप विचित्र दृष्टिकोन पाहिला मिळाला आहे. ती म्हणाली की सानूला पाच भावंडे असून त्या सर्वांचे नातेसंबंध फार गुंतागुंतेचे होते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सानूच्या वडिलांनीही त्याच्या म्हातारपणात दुसरं लग्न केलं होतं. रीता म्हणाल्यात की, “तो दररोज त्यांच्या नवीन वधूला भेटण्यासाठी तयार होऊन घराबाहेर पडायचा आणि ही त्यांच्या घरात एक परंपरा बनली होती.”

रीता म्हणाली की सानूचे(kumar sanu) कुटुंब घटस्फोटाची प्रक्रिया गांभीर्याने कधीही घेत नव्हता. त्या म्हणाल्यात, “या कुटुंबात मी पहिली आणि एकमेव आहे जिने कायदेशीर घटस्फोट घेतला आहे. बाकीचे सर्वजण त्यांचे नातेसंबंध संपवतात पण त्यांना कायदेशीर मान्यता देत नाहीत. ते फक्त एकत्र राहणे थांबवतात आणि लगेचच नवीन जीवन सुरू करतात.” रीता यांनी दावा केला की सानूची एक बहीण, जी सुमारे 45 वर्षांची असून तिला तीन मुलं आहेत. तिच्या मुलांना सोडून तिच्या प्रियकरासह रीताच्या घरी राहायला गेली. दुसऱ्या मेहुणीच्या दुःखद मृत्यूचा संदर्भ देताना रीता म्हणाली की सानूचा भाऊ चंदननेही आपल्या पत्नीला सोडून पुन्हा लग्न केलं, पण तिला कधीही घटस्फोट दिला नाही.

सर्वात गंभीर आरोपांपैकी एकामध्ये, रीता तिच्या मेहुण्याच्या मुलीबद्दल बोलली. ती म्हणाली, “काही काळापूर्वी, मी माझ्या दुसऱ्या मेहुण्याच्या मुलीला भेटली. ती पाच मुलांची आई आहे, प्रत्येकाचे वडील वेगवेगळे आहेत. ती एकदा मुंबईत आली आणि सानूच्या ड्रायव्हरसोबत पळून गेली. त्यानंतर, तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला आणि नंतर कोलकात्याला गेली. आता, तिची मोठी मुलगी 25 वर्षांची आहे आणि सर्वात धाकटी फक्त 5 वर्षांची आहे. तिची धाकटी बहीणही त्याच परिस्थितीत आहे; तिला तीन मुलं आहेत, सर्वांचे वडील वेगवेगळे आहेत.”

रीता म्हणाली की तिची सासू एक चांगली स्त्री होती जी तिच्या पतीमुळे अनेकदा रडायची. तिने सांगितले की, तिच्या पतीच्या वागण्याने तिला आयुष्यभर त्रास होत होता. तिने असाही आरोप केला की, तिची नंणद आणि कुमार सानू यांच्यातील संबंध खूप जवळचे होते. “ते झोपायचे, जेवायचे आणि नेहमी एकत्र असायचे, मजा करायचे.” रीता म्हणते की जेव्हा तिने सानूकडे या सर्व गोष्टींची तक्रार केली तेव्हा तिला कोणताही प्रतिसाद दिला नाही. ती म्हणाली, “मी त्याला मुलांचे आयुष्य उध्वस्त करू नको असे सांगितलं होतं. पण तो हे सर्व पाहून आनंदी होता, कदाचित तो स्वतःही तेच करत होता.”

हेही वाचा :

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA त जाण्याची संधी

नागरिकांनो… आधार कार्डसंदर्भात ‘ही’ चूक केल्यास होणार 10 वर्ष तुरुंगवास!

आधी गर्लफ्रेंडची हत्या, मृतदेहासोबत तरुणाने सेल्फी काढला; नंतर….

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *