वॉशिंग्टन : अमेरिकेला जगातली सर्वात विकसित राष्ट्र म्हणून ओळखले जाते. देशातील रोजगार, राहणीमानाची सोय, आर्थिक ताकद, लष्करी शक्ती यांसरख्या गोष्टींमुळे अमेरिका हा अत्यंत महत्त्वपूर्ण देश मानला जातो. पण गेल्या काही काळात येथील काही लोकांच्या भारताबद्दलची मानसिकता बदलली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Trump) पाहा ना. कधी भारताचे गुनगाण करणारे ट्रम्प अलीकडे भारतविरोधी धोरणांचा अवलंब करत आहेत. यामुळे संपर्ण जगभरात गोंधळ सुरु आहे.

दरम्यान याच वेळी त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील निकटवर्तीयांनी देखील अनेक भारतविरोधी विधाने केली आहे. नुकतेच त्यांच्या एका जवळच्या सहकार्याने टेक्सासमधील भगवान हनुमानाच्या मुर्तीवर वादग्रस्त विधान केले असून यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचली आहे.

अमेरिकेच्या(Trump)टेक्सास राज्या भगवान हनुमानाची ९० फूट उंचीची मूर्ती आहे. ही मूर्ती स्टॅच्यू ऑफ द युनियन म्हणून ओळखली जाते. या मुर्तीवर रिपब्लिकन पक्षाच्या अलेक्झांडर डंकन यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

अलेक्झांडरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, आपण आपल्या टेक्सासमध्ये खोट्या हिंदू देवाची खोटी मूर्ती का उभारत आहोत? आपण एक ख्रिश्चन राष्ट्र आहोत. या विधानामुळे अमेरिकेतील हिंदूंमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. केवळ अलेक्झांडरच नाही, तर अनेक स्थानिक अधिकाऱ्यांनी देखील हनुमान भगवंताच्या मुर्तीला डेमॉन गॉड म्हटले आहे.

दरम्यान अलेक्झांडर डंकनच्या या विधानावर अमेरिकेतील हिंदू समुदायाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. डंकनच्या या विधाना हिंदूविरोधी आणि चिथावणीखोर म्हणून संबोधले आहे. तसेच या प्रकरणावर औपचारिकपण कारवाईची मागणी देखील केली जात आहेत. अनेक भारतीय हिंदूनी, हे विधान भारतीय हिंदूविरोधात द्वेष पसरवणारे आणि त्यांच्या धार्मिक भावनांना ठेच पोहोचणारे असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी डंकन यांना ट्रोल केले आहे.

हेही वाचा :

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…

महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का?

युवराज सिंग ईडी चौकशीसाठी पोहोचला, इतर अनेक क्रिकेटपटूंवर देखील असणार नजर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *