अलीकडच्या तरुण(young) पिढीला सोशल मीडियाचा रोग झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट केले जात आहे. अनेक लोकांचा यामुळे जीव गेला आहे, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पण लोक तरीही सुधारण्याचे नाव काही घेत नाहीत. स्टंटबाजीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शिवाय यामध्ये लाहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.

सध्या असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक तरुणी धोकादायक स्टंट करत आहे. तरुणी(young) धावत्या ट्रेनच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. पण छतावर चढल्यानंतर असे काही घडलं आहे की, पाहून सर्वांचा थरकाप उडेल. तरुणी ट्रेनच्या छतावर चढल्यानंतर तिचा हात तारेला लागला आहे. ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावत असल्याने तारेला हात लागल्यावर मोठा स्फोट झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी धावत्या ट्रेनच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणी छतावर चढतेही. चढल्यावर खाली व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीकडे पाहात आनंद देखील व्यक्त करते. पण याच वेळी बाजूच्या विजच्या खांबाच्या तारेल तरुणीचा हात लागतो आणि मोठा आगाची भडका उडतो. यानंतर नेमकं काय घडलं याची माहिती मिळालेली नाही. तसेच हा व्हिडिओ कुठला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @bottomless_clip या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजार लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. यापूर्वी देखील असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कोणी धोकादायक बाईक स्टंट करत आहे, तर कोणी धावत्या ट्रेनसोबत सेल्फी काढण्याचा, धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. केवळ काही लाईक्ससाठी लोक आपला, आपल्या आसपासाच्या लोकांचा जीव धोक्यात घालत आहे. आपल्याला काही झाल्यास घराच्यांचे काय हाल होतील याचेही भान लोकांना राहिलेले नाही, असे अनेकांनी म्हटले आहे. या तरुण पिढीमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :

चप्पलने मारले, संपूर्ण हॉस्टेलमध्ये निर्वस्त्र फिरवले अन्…

महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का?

युवराज सिंग ईडी चौकशीसाठी पोहोचला, इतर अनेक क्रिकेटपटूंवर देखील असणार नजर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *