Website_Destini 125

Hero Destini 110 एक अशा स्कूटरचे पॅकेज आहे यात(scooters) मायलेज, कम्फर्ट, सेफ्टी आणि स्टाईल सर्वाचा सुंदर मिलाफ केला आहे. ही स्कूटर फॅमिली रायडर्स आणि दैनंदिन गरजांपाहून खास डिझाईन केली आहे.

Hero Destini 110 Scooter: भारताची सर्वात मोठ्या दुचाकी निर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या Hero MotoCorp ने आपल्या स्कूटर पोर्टफोलियोत एक नवीन मॉडेल(scooters) जोडले आहे. कंपनीने आपली नवीन फॅमिली दुचाकी Destini 110 ला लाँच केले आहे. ही स्कूटर खास फॅमिलीसाठी तयार केली आहे. फॅमिली युजर्स, वर्कींग प्रोफेशनल्स आणि फर्स्ट टाईम स्कूटर बायर्स यांना लक्षात घेऊन या स्कूटरचे डिझाईन केले आहे.

या स्कूटरची किंमत ७२,००० रुपये पासून सुरु होऊन ७९,००० रुपये पर्यंत आहे

दमदार इंजिन आणि शानदार मायलेज

Destini 110 मध्ये 110cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे ७,२५० rpm वर 8 bhp पॉवर आणि ८.८७ Nm टॉर्क जनरेट करते. यात कंपनीचे i3s तंत्रज्ञान आणि वन-वे क्लचचा समावेश आहे. Hero च्या दाव्यानुसार ही स्कूटर ५६.२ kmplचा मायलेज देते. जे या सेगमेंटमध्ये सर्वात चांगले आहे.

स्टायलिश डिझाईन आणि रेट्रो टच

डिझाईनच्या बाबतीत Destini 110ला एक नियो-रेट्रो लूक देण्यात आला आहे. यात क्रोम एक्सेंट, प्रोजेक्टर LED हेडलँप आणि ब्रँडचा सिग्नेचर H-शेप्ड LED टेललँप देण्यात आला आहे. याचा लूक असा तयार केला आहे की ही स्कूटर यंग रायडर्सना आणि फॅमिली दोघांना आकर्षित करेल.

कम्पर्ट आणि कन्व्हीनियन्स फिचर्स

या स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वात लांबीच्या 785mm सीटची सुविधा दिली आहे. या इंटीग्रेटेड बॅकरेटस्ट देखील आहे. यात स्पेशस लेगरुम आणि रुंद प्लॅटफॉर्म दिलेला आहे, जो १२ इंच व्हील्सवर चालतो. सोयीसाठी यात फ्रंट ग्लव्ह बॉक्स, बुट लँप आणि एनालॉग-डिजिटल स्पीडोमीटर दिला आहे. तसेच सेफ्टीसाठी यात १९०mm फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे.

जास्त टिकाऊ आणि मजबूत बॉडी

Destini 110 मध्ये मजबूतीवर खास लक्ष दिले आहे. यात तीन मोठे मेटल बॉडी पॅनल्स आहेत.त्यामुळे हीचे आयुष्य दीर्घ झाले असून जे हिला जास्त स्टर्डी बनवतात.

कलरचे पर्याय काय ?

हिरोने या स्कूटरला एकूण ५ रंगात लाँच केले आहे.

VX व्हेरिएंट: Eternal White, Matt Steel Grey आणि Nexus Blue

ZX व्हेरिएंट: Aqua Grey, Nexus Blue आणि Groovy Red

हेही वाचा :

छोटा पॅकेट बडा धमाका!

बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; 

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *