कांदा(Onion) हा भारतीय स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग मानला जातो. पण तो फक्त जेवणाची चव वाढवतो एवढंच नाही तर अनेक आरोग्यदायी आणि घरगुती कामांसाठीही तो अमृततुल्य ठरतो. हेल्थ एक्स्पर्ट्सच्या मते, 100 ग्रॅम कच्च्या कांद्यामध्ये 89 टक्के पाणी, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन सी, बी 6, बी 9, पोटॅशियम आणि सल्फर यासारखे घटक आढळतात. हे घटक पचनक्रिया, बीपी नियंत्रण, हाडांचे व केसांचे आरोग्य आणि त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

परंतु कांद्याचा(Onion) उपयोग फक्त अन्नासाठीच मर्यादित नाही. पाहा, अजून कोणकोणत्या गोष्टींसाठी कांदा उपयुक्त ठरतो :
केसांसाठी नैसर्गिक उपाय – कांद्याचा रस नियमितपणे टाळूवर लावल्यास केस गळती कमी होते, कोंडा दूर होतो आणि केस नैसर्गिकरीत्या काळे व मजबूत राहतात.
उलट्या थांबविण्यासाठी – कांद्याचा रस आणि आल्याचा रस समान प्रमाणात मिसळून घेतल्यास मळमळ आणि उलट्यांचा त्रास पटकन कमी होतो.
मुरुम कमी करण्यासाठी – चेहऱ्यावर कांद्याचा रस 15-20 मिनिटे लावल्याने पिंपल्स कमी होतात आणि डाग हलके होतात.
चीला किंवा डोसा चिकटू नये म्हणून – तव्यावर कांद्याचा तुकडा चोळल्यास पिठाचे पदार्थ चिकटत नाहीत. ही आजीबाईंची पारंपरिक युक्ती आहे.
कीटकांना पळवण्यासाठी – कांद्याचा(Onion) रस व पाणी एकत्र करून स्प्रे केल्यास घरातील किडे, कीटक आणि सरडे दूर राहतात.म्हणजेच, आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा साधा कांदा हा एक आरोग्याचा आणि घरकामाचा बहुगुणी मित्र आहे.
हेही वाचा :
इथे आहे देवी ब्रह्मचारिणीच अनोखं मंदिर,
पदरात अडीच वर्षांची मुलगी अन् पतीचं जाणं..;
पाकिस्तान विरुद्ध महागड्या ठरलेल्या बुमराहला आज बसवणार का?