बदलत्या जीवनशैलीत आरोग्यावर(health) भर देत आहारात विविध बदल करण्याची लोकांना सवय लागली आहे. गहूऐवजी मल्टीग्रेन धान्य, बाजरी, नाचणी, ज्वारी यांचा समावेश केला जातो, जे शरीराला आवश्यक पोषक घटक देतात. विशेषतः नाचणी खूप फायदेशीर असून, कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम स्रोत मानली जाते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात, पचन सुधारते आणि भूक नियंत्रित राहते.

नाचणीपासून तुम्ही केवळ भाकरीच नव्हे, तर अनेक चविष्ट पदार्थ बनवू शकता.
१. नाचणी खिचू
गुजराती नाश्त्याचा लोकप्रिय प्रकार खिचू आता नाचणीच्या पिठापासूनही बनवता येतो.
पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात हिंग, आले-हिरवी मिरची पेस्ट, मीठ आणि बारीक चिरलेली गाजर, बीन्स शिजवा.
नाचणीचे पीठ पाण्यात मिक्स करून पॅनमध्ये टाका आणि घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
प्लेटमध्ये काढून तेल किंवा तूप, कोथिंबीर आणि लोणचं मसाला टाकून गरमागरम सर्व्ह करा.
२. नाचणी इडली
इडली बनवण्यासाठी नाचणीचे पीठ आणि रवा समान प्रमाणात एकत्र करा. दही आणि मीठ टाकून १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर इडलीच्या साच्यात टाकून १५–२० मिनिटे वाफेवर शिजवा.
पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, लाल तिखट, मीठ व हळद परतून नाचणी इडली मिक्स करा.
गरमागरम सर्व्ह करा.

३. नाचणी सँडविच
पॅनमध्ये पाणी उकळवून नाचणीचे पीठ २–३ मिनिटे शिजवा.
मऊ पीठ मळून १०–१५ मिनिटे झाकून ठेवा.
पीठाचे लहान गोळे करून चपाती प्रमाणे लाटा आणि पॅनवर भाजा.
भाजलेल्या पोळीवर हिरवी चटणी लावा, उकडलेले बटाटे, टोमॅटो, कांदे, काकडीचे तुकडे, किसलेले चीज आणि चाट मसाला टाका.
सँडविच दोन्ही बाजूने टोस्ट करा आणि गरमागरम सर्व्ह करा.
नाचणीपासून बनवलेले हे पदार्थ स्वादिष्ट आणि आरोग्यास (health)फायदेशीर आहेत. यामुळे हाडे मजबूत राहतात, पचन सुधारते आणि संपूर्ण कुटुंबासाठी पौष्टिक आहार उपलब्ध होतो.
हेही वाचा :
हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढली….
अमेरिकेने दिला धोका, आता ‘या’ देशाने भारतीयांसाठी उघडला दरवाजा
पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्षेपार्य कृतीवर टीम इंडियाची पहिली प्रतिक्रिया