दिल्ली – वसंत कुंज येथील एका प्रसिद्ध आश्रमात(ashram) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमाशी संलग्न श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट मध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रम प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती (उर्फ पार्थ सारथी) वर गंभीर लैंगिक छळ, अश्लील भाषा, असभ्य मेसेज पाठवणे आणि बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न याबाबत आरोप केले आहेत.

आरोपी स्वामी चैतन्यानंद सध्या घटास्थळावरून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. विद्यार्थिनींच्या जबाबानुसार, आश्रमातील(ashram) काही महिला कर्मचारी आणि वॉर्डन यांनी आरोपीशी भेट घडवून दिली, त्याच्या कृत्यात साथ दिली आणि पीडितांवर क्षमा मागण्यासाठी दबाव टाकला. यामुळे प्रकरण अधिक गंभीर स्वरूप धारण झाले.पोलिस तपासात समोर आले की, आरोपीकडून महागडी वॉल्वो कार, ज्यावर बनावट UN नंबर प्लेट लावण्यात आली होती, जप्त करण्यात आली आहे. युएनकडून अहवाल मागवला असता असा क्रमांक अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले.


घटनास्थळी ३२ विद्यार्थिनींचे जबाब नोंदले गेले असून, त्यापैकी १७ विद्यार्थिनींनी छेडछाड, अश्लील वर्तन आणि बळजबरीचा प्रयत्न याबाबत स्पष्ट केले. आरोपीवर अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितांच्या तक्रारीतून मिळाले आहेत.दिल्ली शाखेतील या आश्रमावर पूर्ण जबाबदारी स्वामी चैतन्यानंद यांच्यावर होती, परंतु विद्यार्थिनींच्या आरोपांनंतर प्रशासनाने त्यांना पदावरून हटवून बाहेरचा रस्ता दाखवला. पोलीस आता प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत आणि आरोपीपर्यंत लवकर पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
हे प्रकरण विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी, आश्रम व्यवस्थापनाच्या जबाबदारीसाठी आणि सार्वजनिक हितासाठी गंभीर दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.
हेही वाचा :
एटीएम कार्डधारकांनो सावधान! PIN सेट करताना ‘हे’ नंबर वापरले तर..
कमालीची सुंदर आहे आर्यन खानची गर्लफ्रेंड…फोटो व्हायरल
निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो कांदा…. जाणून घ्या फायदे