आजकाल डिजिटल व्यवहार वाढल्याने ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. बँक खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत आणि सुरक्षित एटीएम(ATM) पिन असणे अत्यंत आवश्यक आहे. पण ग्राहकांकडून पिन सेट करताना होणाऱ्या छोट्या चुका सायबर ठगांसाठी मोठी संधी ठरतात. त्यामुळे अशा चुका टाळणे गरजेचे आहे.

सायबर तज्ज्ञांच्या मते, 1234 आणि 0000 हे पिन कोड संपूर्ण जगभरात सर्वाधिक वापरले जातात. पण हेच पिन सगळ्यात सोपे असल्यामुळे सायबर ठग सहज हॅक करू शकतात. याशिवाय 1111, 2222 यांसारख्या एकाच अंकाची पुनरावृत्ती असलेले पिन कोड धोकादायक ठरतात.अनुक्रमे येणारे क्रमांक जसे की 2345, 4567 किंवा तत्सम पिन देखील सुरक्षित नसतात. त्याचप्रमाणे स्वतःची वैयक्तिक माहिती जसे की जन्मवर्ष (1997, 2000, इ.) पिन म्हणून वापरणे टाळावे. कारण अशा पिन्सचा अंदाज लावणे सायबर गुन्हेगारांसाठी सोपे जाते.

एटीएम(ATM) पिन सेट करताना सहजासहजी ओळखता येणार नाही असा अंकांचा संगम निवडावा. आकडे अनियमित पद्धतीने निवडून पिन तयार करावा. पिन कोड कधीही डायरी, मोबाइल मेमो किंवा कागदावर लिहून ठेवू नये. वेळोवेळी पिन बदलत राहणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आहे.सायबर चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बँका ग्राहकांना पिनसंबंधी सतत जागरूक करत आहेत. मात्र सर्वात मोठी जबाबदारी ग्राहकांची आहे. सावधगिरी बाळगल्यासच आपले बँक खाते सुरक्षित राहील आणि सायबर फसवणुकीपासून बचाव करता येईल.

हेही वाचा :

कमालीची सुंदर आहे आर्यन खानची गर्लफ्रेंड…फोटो व्हायरल

निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो कांदा…. जाणून घ्या फायदे

आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *