नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवास केला जातो. या (Navratri)उपवासाच्या कालावधीमध्ये शारीरिक कष्टाची कामे केल्यामुळे शरीरात अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. त्यामुळे उपवासाच्या कालावधीमध्ये थकवा जाणवू नये म्हणून फॉलो करा या टिप्स.

सर्वच महिला नवरात्री उत्सवाची आतुरतेने वाटत पाहत (Navratri)असतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे मोठा आनंद आणि उत्साह असतो. महिला नऊ दिवस उपवास करतात. उपवास केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण चुकीचा डाएट फॉलो केल्यास आरोग्याला हानी पोहचते. नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी कुंकूमार्चन, हळदी- कुंकू, कुमारिका पुजन, सप्तशतीचे पाठ इत्यादी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांमध्ये महिला अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात. पण बऱ्याचदा नऊ दिवसांच्या उपवासामुळे शरीरातील ताकद कशी कमी होऊन जाते. शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नवरात्रीच्या उपवासात थकवा, अशक्तपणा येऊ नये म्हणून कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

नवरात्रीच्या उपवासात अशक्तपणा येऊ नये म्हणून आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन:
उपवास केल्यानंतर आहारात नेहमीपेक्षा खूप कमी अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. याशिवाय पाण्याचे सेवन सुद्धा कमी केले जाते. यामुळे अशक्तपणा, थकवा, कमजोरी किंवा इतरही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला हानी पोहचते.अशक्तपणा आल्यानंतर डॉक्टर वेगवेगळ्या ब्लड टेस्ट करण्यास सांगतात. शरीरात विटामिन, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराला हानी पोहचते. अशावेळी वेगवेगळ्या पदार्थांचे आणि सप्लिमेंट्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
दैनंदिन आहारात अनेकांना भरपेट खाण्याची सवय असते. पण उपवासाच्या दिवसांमध्ये असे होत नाही. उपवासाच्या दिवशी मोजक्या अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. उपवास केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये या सवयींचा त्रास होतो. मात्र सवय झाल्यानंतर शरीराला योग्य प्रमाणात खाण्याची सवय लागते.
उपवासाच्या नऊ दिवसांमध्ये जास्त मेहनत करावी लागेल अशी कोणतीही कामे करू नये. शारीरिक कष्टाची कामे केल्यानंतर उपवासाआधीच शरीर थकून जाते. थकलेल्या शरीराने उपवास केल्यास शरीराची शक्ती आणखीनच कमी होऊन जाते आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे उपवास करण्याच्या काही दिवस आधी जास्त कष्टाची कामे करू नये. यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही.
हेही वाचा :
हवामान विभागाच्या नव्या इशाऱ्यानं चिंता वाढली….
अमेरिकेने दिला धोका, आता ‘या’ देशाने भारतीयांसाठी उघडला दरवाजा
पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्षेपार्य कृतीवर टीम इंडियाची पहिली प्रतिक्रिया