यंदा महाराष्ट्रात(Maharashtra) मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आणि राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सामान्यत: राज्यात मान्सून ७ जूनच्या आसपास दाखल होतो, परंतु यंदा २६ मे रोजीच पाऊस सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिमुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. अनेक गावांना पुराचा वेढा पडला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीचे पिकं वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. १५ सप्टेंबरपासून मान्सून परतेल, आणि १२ ते १५ ऑक्टोबरपर्यंत तो भारतातून पूर्णपणे परतेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
तसेच, जाता-जाता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः ओडिशा, आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये पुढील दोन दिवस जोरदार पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रालाही हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यंदा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, आणि शेतीसंबंधित उपाययोजना करण्यास हवे(Maharashtra).
हेही वाचा :
अमेरिकेने दिला धोका, आता ‘या’ देशाने भारतीयांसाठी उघडला दरवाजा
पाकिस्तानी खेळाडूंच्या आक्षेपार्य कृतीवर टीम इंडियाची पहिली प्रतिक्रिया
UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; 1ऑक्टोबरनंतर होणार ‘हे’ बदल