लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच चटपटीत(potato) पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो बाइट्स बनवू शकता. जाणून घ्या पोटॅटो बाइट्स बनवण्याची रेसिपी.

सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर प्रत्येकालाच नाश्ता करण्याची सवय असते. नाश्ता केल्यामुळे आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, (potato)शिरा, इडली, डोसा खाल्ला जातो. मात्र कायमच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीच पोटभर नाश्ता करावा. कारण नाश्ता केल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचमीत आणि टेस्टी पोटॅटो बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बऱ्याचदा लहान मुलांना शाळेच्या डब्यात किंवा बाहेर फिरायला जाताना काहींना काही टेस्टी पदार्थ हवा असतो, अशावेळी तुम्ही पोटॅटो बाइट्स बनवू शकता. लहान मुलांना बटाट्यापासून बनवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया पोटॅटो बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

बटाटा
ब्रेड
तांदळाचे पीठ
मीठ
हिरवी मिरची
कोथिंबीर
लाल तिखट
चाट मसाला
गरम मसाला

कृती:

चमचमीत पोटॅटो बाइट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटा उकडवून घ्या. उकडलेल्या बटाट्याची साल काढून बारीक बारीक तुकडे करा.

वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात ब्रेड मऊ होईपर्यंत भिजवून घ्या. मोठ्या वाटीमध्ये मॅश केलेला बटाटा, मऊ केलेले ब्रेड घालून व्यवस्थित मिक्स करा.

त्यानंतर त्यात लाल तिखट, हिरवी मिरची, गरम मसाला, चाट मसाला, तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.

सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.

तयार केलेल्या मिश्रणाचा गोळा करून तेल लावलेल्या तटावर एकसमान पसरवून घ्या. त्यानंतर सुरीच्या सहाय्याने तुकडे करून कढईमधील गरम तेलात पोटॅटो बाइट्स दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पोटॅटो बाइट्स. हा पदार्थ सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

हेही वाचा :

जेवल्यानंतर आता नाही येणार झोप! 

उपाशी पोटी नियमित एक सफरचंद खाल्ल्यास शरीरात दिसून येतील ‘हे’ मोठे बदल,

आज ऑक्टोबरचा पहिलाच दिवस राशींसाठी भाग्यशाली! कुबेराचा खजिना उघडणार,

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *