दिवसाची सुरुवात आनंदायी आणि उत्साहाने होण्यासाठी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय नाश्ता कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवनवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या (easy)पद्धतीमध्ये मसाला भरलेली स्टफ्ड इडली बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात.

बऱ्याचदा लहान मुलं घरात आवडीचा नाश्ता नसेल तर बाहेरील पदार्थ खाण्याचा हट्ट करतात. पण कायमच तिखट आणि तेलकट पदार्थाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे लहान मुलांच्या आवडीनुसार त्यांना घरीच वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनवून खाण्यास द्यावेत. तुम्ही बनवलेली मसाला इडली घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया मसाला इडली बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
इडली बॅटर
गाजर
मीठ
टोमॅटो
मटार
आलं
हिरवी मिरची
जिरं
मोहरी
कढीपत्ता
हळद
तेल
कोथिंबीर
कृती:
मसाला भरलेली स्टफ्ड इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, सर्व भाज्या स्वच्छ धुवून व्यवस्थित बारीक चिरून घ्या. भाज्या चिरताना जास्त जाड कापू नये.मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरून घेतलेल्या भाज्या आणि शिजवलेला बटाटा टाकून मॅश करून घ्या.कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं (easy)आणि कढीपत्ता टाका. त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट टाकून व्यवस्थित भाजून घ्या. लसूणचा उग्र वास यामुळे कमी होईल.त्यानंतर त्यात कांदा, टोमॅटो, गाजर, मटार घालून व्यवस्थित शिजवून घ्या. सर्व भाज्या शिजल्यानंतर त्यात तयार केलेलेबटाट्याचे मिश्रण टाकून हलक्या हाताने मॅश करा आणि व्यवस्थित शिजवा.
वरून त्यावर चवीनुसार मीठ, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात तयार केलेले इडली बॅटर टाका. नंतर त्यात तयार केलेला मसाला टाकून पुन्हा एकदा वरून तयार केलेले इडली बॅटर टाकून इडली वाफवण्यासाठी ठेवा. १५ ते २० मिनिटं होईपर्यंत इडली वाफवून घ्या.तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मसाला भरलेली स्टफ्ड इडली. खोबऱ्याच्या चटणीसोबत इडली अतिशय सुंदर लागेल.
हेही वाचा :
आज तुमचं भविष्य काय सांगतं…..
Raj Kumar Rao ने खरेदी केली ‘ही’ आलिशान कार, किंमत तब्बल 2.15 कोटी
ट्रॅकवर अडकलेली बाईक उचलायला गेला, मागून Railway आली अन्…; Video Viral