हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून महाराष्ट्रात आणखी एका (suicide)नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर येथे अमृता गुरव हिने सासरच्या जाचामुळे आयुष्याची अखेर केली. सासूच्या औषधोपचारासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी अमृता गुरव हिचा छळ होत असल्याचा आरोप आहे. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची माहिती आहे.या घटने प्रकरणी इश्वरपूर येथे राहणारा अमृताचा पती ऋषिकेश, सासू सासरे आणि नणंद यांच्यावर इश्वरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, एक वर्षापूर्वी कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता अमृताने ऋषभ याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. वर्ष पूर्ण होण्याआधीच तिने मृत्यूला कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

26 डिसेंबर 2024 रोजी ऋषिकेश आणि अमृता यांचा प्रेम विवाह झाला होता.(suicide) लग्नानंतर काही महिन्यातच पती ऋषिकेश आणि सासरच्या मंडळींनी आजारी सासूच्या औषध-उपचारांसाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्यासाठी तिचा छळ सुरु केल्याचा आरोप आहे.खरं तर अमृताने माहेरच्या माणसांच्या विरोधात जाऊन ऋषिकेश याच्याशी प्रेम विवाह केला होता. अमृताच्या आत्महत्येनंतर तिचे अंत्यदर्शन करण्यासाठी आलेली तिची आई आणि वडील यांनी लेकीचा मृतदेह बघून हंबरडा फोडला.

दुसरीकडे, मुलाला एका गुन्ह्यात अटक झाल्याच्या दोन दिवसांनंतर वडिलांनी घरात गळफास घेतल्याची घटना रविवारी रात्री भोकर, जि. जळगाव, येथे घडल्याचे समोर आले आहे. आत्माराम प्रल्हाद सपकाळे असे ४५ वर्षीय मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा मुलगा हर्षल याला भादली गावातील एका घटनेप्रकरणी तीन ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.तर नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरातील शेळके गल्ली, तांबेश्वर नगरात ६५ वर्षीय बाळासाहेब धोंडीबा गाडेकर राहत होते. त्यांनी शनिवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरात टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुःखद घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
फक्त कल्पना हवी!
शेतकऱ्यांना 2,265 कोटींचा फायदा
कंपनीचा शेअर एकाच दिवसात 38 टक्के वाढला