ओव्हल कसोटी सामन्यादरम्यान स्टंप माइकवर रेकॉर्ड केलेला भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि आकाश दीप यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये गिलने आकाश दीपला इंजेक्शन घेण्याबद्दल विचारले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलच्या मैदानावर सुरू असलेल्या अखेरच्या कसोटी सामन्यात खेळापेक्षा जास्त चर्चेत आहे एक संवाद (Communication)तोही कर्णधार शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप यांच्यातला. स्टंप माइकमध्ये कैद झालेल्या या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

ओव्हल टेस्टच्या चौथ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ वेळेपूर्वीच थांबवण्यात आला. इंग्लंडला अंतिम डावात 374 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. दिवसाचा खेळ थांबवला गेला तेव्हा इंग्लंडने 6 गडी गमावत 339 धावा केल्या होत्या आणि त्यांना विजयासाठी केवळ 35 धावांची गरज होती. भारताला सामना जिंकण्यासाठी उरलेले 4 गडी बाद करावे लागतील.चौथ्या दिवशीचा खेळ सुरू असताना जो रूट आणि हैरी ब्रूकने भारतीय गोलंदाजांना पुरता त्रास दिला.

याच दरम्यान हैरी ब्रूकने आक्रमक फलंदाजी करत एक फटका मारला जो सरळ आकाश दीपच्या पायावर जाऊन आदळला. त्या प्रसंगानंतर आकाश दीप वेदनेत दिसून आले. काही वेळाने शुभमन गिलने त्यांची चौकशी करत मिश्कीलपणे विचारलं, “इंजेक्शन घेतलंस का रे तू?” आणि हे बोलणं स्टंप माइकमध्ये कैद झालं(Communication). चाहत्यांनी या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच उचलून धरलं आहे.

भारतीय संघाकडून या सामन्यात चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा होती, पण चौथ्या दिवशी भारतीय वेगवान माऱ्याला अपेक्षित यश मिळालं नाही. आकाश दीपने केवळ एकच बळी घेतला तोही हैरी ब्रूकचा. प्रसिद्ध कृष्णाने 100 पेक्षा अधिक धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजला 2 बळी मिळाले. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना मोठ्या धावसंख्येपासून रोखण्यात यश मिळू दिलं नाही.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *