चोरीचा तपास लावण्यासाठी पोलीसांकाकडे तक्रार देण्याऐवजी (investigate)चक्क मांत्रिकाला बोलावून सर्व गावासमोर जादुटोणा करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडलाय. चोरीचा संशय असणाऱ्यांना मांत्रिकाने पानाचा विडा खायला लावला. या सर्व भोंदूगिरीचा व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मोबाईलमुळे गावागावात इंटरनेट पोहोचून जगाशी गावं कनेक्ट झाली असली तरी गावखेड्यात अजूनही अंधश्रद्धेचा किती पगडा आहे याचा प्रत्यय देणारी घटना नांदेड जिल्ह्यात समोर आलीये. अत्यंत धक्कादायक आणि पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी वाटावी अशी ही घटना आहे. चोरीच्या संशयावरून सहा जणांना गावातील हनुमान मंदिरासमोर उभे टाकवून त्यांना पाण्याच्या हौदात बुडवण्यात आले. तांदूळ टाकलेला पानाचा विडा त्यांना खाऊ घालण्यात आला. सर्व गावकऱ्यांसमोर हा प्रकार सुरु होता.

बिलोली तालुक्यातील केरूर येथील रामा आरोटे यांच्या घरी 19 जुलै रोजी चोरी झाली होती. (investigate)याबाबत आरोटे यांनी पोलिसांकडे तक्रार केली नाही. 11 ऑगस्ट रोजी धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथिल गंगाराम कादरी या मांत्रिकाला बोलावले. ज्यांच्यावर संशय होता तो परमेश्वर राठोड आणि अन्य 5 जण असे गावातील एकूण 6 जणांना हनुमान मंदिरासमोर उभे टाकवण्यात आले. या मांत्रिकाने सर्व गावकऱ्यांसमोर अंधश्रद्धेचा बाजार मांडला. गावातील हनुमान मंदिरासमोर लिंबू, मिरची, नारळ ठेवून भोंदू बाबा गंगाराम कादरी याने त्याचा खेळ सुरु केला.

ज्यांच्यावर चोरीचा संशय होता अश्या सहा जणांना पाण्याच्या हौदात बुडवण्यात आले. त्यानंतर त्यांना तांदूळ टाकून मंतरलेला पानाचा विडा खायला लावला. पोलीस पाटलाने यासाठी विरोध केला. तरीही प्रकार सुरु असल्याने पोलीस पाटील यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला.पोलीस पाटील वानोळे यांनी व्हिडिओ पोलीसांना दिला. रामतीर्थ पोलिसांनी या प्रकरणात जादूटोना कायद्यान्वये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (investigate) एकविसाव्या शतकातही ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धा कायम आहे हे या घटनेवरून दिसून आले.

हेही वाचा :

३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *