वास्तुशास्त्रानुसार, अनेक घटनांचा शुभ-अशुभ अर्थ निघतो.(inauspicious) जसं की अचानक काच फुटणे हे संकट टळल्याचे सूचक आहे, या गोष्टी नक्की काय दर्शवतात हे जाणून घेऊन वास्तुशास्त्रानुसार, काच अचानक फुटणे आणि तुळस सुकणे, गाय दाराशी येणे यासारख्या घटना काय दर्शवतात?वास्तुशास्त्रात, व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या काही घटना भविष्यातील शुभ आणि अशुभ संकेतांशी जोडलेल्या असतात. जसं की काच फुटणे किंवा तुळस सुकणे किंवा देवाची मूर्ती पडणे अशा बऱ्याच घटना असतात ज्याच्या अर्थ लागणे थोडे कठीण असते.पण त्यामागे खरंच काही संकेत असतात का? जाणून घेऊयात अशा कोणत्या घटना आहेत ज्या घडल्यानंतर काय संकेत मिळतात.

काच फुटणे आणि तुळस सुकणे हे काय दर्शवते?(inauspicious) वास्तुशास्त्रात अशा काही घटनांचा उल्लेख आहे ज्या भविष्यात शुभ किंवा अशुभ घटना दर्शवतात. यामध्ये घड्याळ अचानक पडणे किंवा तुटणे, काच फुटणे आणि तुळशीचे रोप अचानक सुकणे यासारख्या घटनांचा समावेश आहे. घरात अचानक घडणाऱ्या घटनांचा अर्थ खरंच काय निघतो हे जाणून घेऊयात. जसं की, काच फुटणेवास्तुशास्त्रानुसार, काच अचानक फुटणे हे तुमच्यावर येणारी समस्या टळल्याचे लक्षण आहे. पण काच तुटण्याचा प्रकार वारंवार घडत असेल तर हे नकारात्मक उर्जेचं लक्षण असू शकतं. घड्याळ पडणे किंवा तुटणे वास्तुशास्त्रानुसार, जर तुमचे घड्याळ अचानक पडले किंवा तुटले तर ते तुमच्यासाठी चांगल्या किंवा वाईट काळाचे लक्षण आहे. तसेच असेही म्हटले जाते की तुमच्यावर काही येणारं संकट असेल तर ते टळतं किंवा त्याचे संकेत म्हणजे घडाळ्याची काच तडकणे.

तुळस अचानक सुकणेवास्तुशास्त्रानुसार, जर शरद ऋतू व्यतिरिक्त किंवा पाणी देऊनही तुळस अचानक सुकत असेल तर ते भविष्यात येणाऱ्या समस्येचं लक्षण मानलं जातं.देवाची मूर्ती तुटणे किंवा पडणे वास्तुशास्त्रानुसार, जर देवाची मूर्ती किंवा फोटो अचानक पडला किंवा तुटला तर ते संकटाचं सूचक असतं असं म्हटलं जातं.(inauspicious) अशावेळी देवाकडे येणारं संकट टाळण्यासाठी, आपलं रक्षण करण्यासाठी प्रार्थना करावी. गाय स्वत:हून दाराशी येणे वास्तुशास्त्रानुसार, जर गाय स्वतःहून दाराशी आली तर ते शुभकार्याचे लक्षण मानले जाते. असे गाय स्वत:हून दाराशी आली तर व्यक्तीला शुभ परिणाम किंवा शुभवार्ता मिळते.
हेही वाचा :
३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…