तर या मंदिरात आल्यावर भाविकांचे हृदयासंबंधीचे आजार दूर पळतात अशी मान्यता आहे.(diseases) भगवान शंकराच्या दर्शनाने त्यांना हा आजार बळावत नसल्याचा दावा करण्यात येतो. कुठं आहे हे मंदिर? या मंदिरात भगवान शंकराच्या दर्शनानेच बरा होतो हृदयरोग; ती रंजक कहाणी काय? येथे बरे होतात हृदयाशीसंबंधित रोग भारतात अनेक तीर्थक्षेत्र आहेत. अनेक मंदिरं आहेत, त्यांच्याशी संबंधित अनेक अख्यायिका आणि श्रद्धा आहेत. भाविक भक्तांना त्याचे आश्चर्य वाटते. असेच एक अनोखे मंदिर आहे.(diseases) जिथे भाविकांचे आजारपण कुठल्या कुठे पळून जाते अशी मान्यता आहे. भगवान शंकराच्या दर्शनानेच येथे आलेल्या भाविकांच्या हृदयासंबंधीचे आजार दूर पळतात अशी मान्यता आहे. उच्च रक्तदाब असो वा इतर हृदयाशी संबंधित आजार असोत ते पळून जातात, अशी मान्यता आहे. हे मंदिर तामिळनाडू राज्यात आहे. काय नाव आहे या मंदिराचं?

हृदयाशी संबंधित आजार पळतात दूर तर या जादुई मंदिराचे नाव हृदयलेश्वर मंदिर असे आहे. हे मंदिर तामिळनाडू राज्यात आहे. येथे भाविकांचा उच्च रक्तदाब, हृदयातील ब्लॉकेज या सारख्या समस्या भगवान शंकराच्या दर्शनानेच बरे होतात. सोशल मीडियावरील इन्फुएंसर द टेम्ल गर्लने तिच्या इन्स्टाग्रामवर याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. (diseases)हजारो हृदयरोगी त्यांचे आजार बरे करण्यासाठी पूर्ण श्रद्धेने या मंदिरात येतात. भगवान शिवाला साकडं घालतात आणि त्यांचे रोग बरे होतात अशी मान्यता आहे.

हृदयलेश्वर मंदिराची खासियत तरी काय? तामिळनाडूतील हृदयलेश्वर मंदिराचा हृदयाचा स्वामी या अर्थाने आहे. या मंदिरात दूध, फुल, बेल वाहून भगवान शिवाची पूजा करण्यात येते. या मंदिरात भगवान शंकर पश्चिमेकडील तर माता पार्वती या दक्षिणेकडील वेगवेगळ्या गर्भगृहात विराजमान आहेत. भगवान गणेश, भगवान सुब्रमण्यम त्यांच्या पत्नी वल्ली आणि देवसेना, चंडिकेश्वर, नटराज आणि नंदी यांच्यासह मंदिराच्या मोठ्या प्रांगणात विराजमान आहेत. दर सोमवारी भाविक भक्त हे हृदयरोगापासून मुक्ती मिळावी म्हणून या मंदिरात प्रार्थना करतात. हे मंदिर तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात आहे. श्रद्धेने आणि भक्तीभावाने पूजा केल्यास आजार बरे होतात असे ते म्हणाले.

हृदयालीश्वर मंदिराची ती अनोखी कहाणी हृदयालीश्वर मंदिराशी संबंधित मान्यतेनुसार, पूसलार नयनार नावाचा एक गरीब शिवभक्त होता. त्याचे एक मोठे दुःख होते की त्याला भगवान शिवाचे मंदिर बांधता आले नाही. मग त्याने हृदयातच शिवाचे मंदिर रचले. त्याने शंकराचा धावा केला. त्याचा ध्यास, भक्ती पाहुन भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी एक मंदिर तयार केले. या मंदिरात विधीनुसार, महादेवाच्या पिंडीची, शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. भगवान शंकर पुसलारच्या हृदयात सामावले असल्याने या मंदिराचे नाव हृदयालीश्वर असे पडले.

हेही वाचा :

३ दिवस बँका राहणार बंद, कधी आणि कुठे?
कोकणात जाणाऱ्यांना बाप्पा पावला; मोफत प्रवास, जेवण अन्….
नवऱ्याने बायकोला झोपायला बोलावले अन्…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *