बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित — 90 च्या दशकातील सर्वात मोहक आणि लोकप्रिय अभिनेत्री. तिच्या सौंदर्यानं आणि अभिनयानं लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य केले. पण तिच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘खलनायक’ (1993) मधील प्रसिद्ध गाणं(song) ‘चोली के पीछे क्या है’ एकेकाळी प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.

अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायलेल्या या गाण्याचे बोल अश्लील आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह असल्याचं सांगत काही संघटनांनी तीव्र विरोध केला. या विरोधाची लाट एवढी वाढली की हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. तक्रारदारांनी सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटातून हे गाणं हटवण्याची आणि विक्री झालेल्या कॅसेट्स परत मागवण्याची मागणी केली.

कोर्टानं मात्र स्पष्ट केलं की, या गाण्यात काहीही आपत्तीजनक नाही. तरीदेखील वाद शांत झाला नाही. अखेर, दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओनं या गाण्यावर बंदी घातली, आणि त्याचं प्रसारण थांबवण्यात आलं.या सर्व गदारोळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माधुरी आणि सुभाष घई यांना पाठिंबा दिला. ठाकरे यांनी म्हटलं की, “या गाण्यात(song) काहीही चुकीचं नाही, विरोध थांबवावा.”

तरीसुद्धा ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. उलट, त्याच्या लयी आणि माधुरीच्या अदांनी ते अमर झालं. काळाच्या ओघात हे गाणं आजही लोकांच्या ओठी आहे, आणि 2024 मध्ये ‘क्रू’ चित्रपटात (करीना कपूर, तब्बू आणि कृती सेनॉन अभिनीत) त्याचं रिमेक वर्जन दाखवण्यात आलं, जे पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.चार कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘खलनायक’ने 21 कोटींची कमाई केली, आणि ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यानं भारतीय चित्रपटसृष्टीत कायमस्वरूपी ठसा उमटवला.

हेही वाचा :

आता बॅलन्स नसतानाही होणार UPI पेमेंट! जाणून घ्या कसे…

कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न…

शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *