संदीप रेड्डी वांगा यांच्या “स्पिरिट” या चित्रपटात दीपिका पदुकोणने दिवसाला आठ तास काम करण्याची अट घातली होती. तिला तिच्या मुलीच्या संगोपनासाठी अधिक वेळ द्यायचा होता. यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. परंतु, दीपिका या विषयावर बोलत राहते. अलिकडच्याच एका मुलाखतीत तिने तिच्या आठ तासांच्या कामाच्या वेळापत्रकाचे समर्थन केले आणि बॉलीवूडच्या वर्क कॅल्चरबद्दलही(culture) प्रश्न उपस्थित केले.

CNBC TV18 ला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पदुकोण म्हणाली, “भारतीय चित्रपट उद्योगात बदल घडवून आणण्याबाबत मी नेहमीच आवाज उठवत आहे कारण इंडस्ट्री खूप अव्यवस्थित आहे. आपल्याला सतत असं वाटतं चालंय तर चालू देत. पण मी अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना गोष्टी सुधारायला आवडतात. जर आपण स्वतःला एक इंडस्ट्री मानतो पण आपण त्याप्रमाणे काम करत नाही, तर आपण एक अतिशय अव्यवस्थित इंडस्ट्री आहोत. आता एक व्यवस्था आणि चांगली कार्य संस्कृती निर्माण करण्याची वेळ आली आहे.”

त्याच मुलाखतीत दीपिका पदुकोण म्हणाली की तिला कोणाचेही नाव घेऊन वाद निर्माण करायचा नाही. परंतु, बॉलीवूडमध्ये असे अनेक पुरुष कलाकार आहेत जे वर्षानुवर्षे फक्त आठ तास काम करत आहेत आणि आठवड्याच्या शेवटीही काम करत नाहीत. हे मुद्दे उपस्थित करून, दीपिका चित्रपट उद्योगात महिला कलाकारांसाठी एक चांगली कार्य संस्कृती निर्माण करू इच्छिते हे स्पष्ट होत आहे.

अभिनेत्री दीपिका पदुकोण जागतिक मानसिक आरोग्य दिनासाठी मध्य प्रदेशला गेली होती. तिथे तिने तिच्या फाउंडेशन, लिव्ह लव्ह लाफचा १० वा वर्धापन दिन साजरा केला. अभिनेत्रीचा हा फाउंडेशन देशभरात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मानसिक आरोग्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभावीपणे आवाज उठवत असलेल्या दीपिकाने या कार्यक्रमात स्वतःच्या प्रवासावर आणि संस्थेच्या प्रभावावर चिंतन केलं. दीपिकाच्या आगामी चित्रपटाबद्दल, ती शाहरुख खानच्या “किंग” चित्रपटात काम करत आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील या ॲक्शन चित्रपटात काम करत आहे(culture).

हेही वाचा :

माधुरी दीक्षितचं ‘हे’ गाणं दुरदर्शन, रेडियोवर केलेलं बॅन….

आता बॅलन्स नसतानाही होणार UPI पेमेंट! जाणून घ्या कसे…

कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *