पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाद्वारे अंतिम केलेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. ही यादी 1 जुलै 2025 रोजी अंतिम करण्यात आली असून, त्यानंतर नावनोंदणी केलेल्या नवीन मतदारांना या निवडणुकीत (election) मतदान करण्याचा हक्क मिळणार नाही. आयोगाच्या माहितीनुसार, शहरातील सुमारे 35 लाख मतदारांना या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे.

पुढील माहिती देताना निवडणूक(election) अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले की, यापूर्वीच्या महापालिका निवडणुकांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मतदारांची यादी घेऊन ती प्रभागनिहाय आणि मतदान केंद्रानिहाय विभागली जात असे. मात्र या वेळी केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेली यादीच वापरण्याचे आदेश आहेत, स्थानिक पातळीवरून यादी घेण्यास परवानगी नाही. महापालिकेला आयोगाकडून ही यादी मिळाली असून लवकरच प्रभागनिहाय विभागणी सुरू होईल.

याशिवाय, आगामी निवडणुकीसाठी महापालिकेच्या अंतिम प्रभागरचनाला मान्यता देण्यात आली असून, काही दिवसांत प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण दिले जाईल.

पुणे महापालिकेच्या 2011 च्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित ही निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी 40 प्रभाग चार-चार सदस्यांचे असतील, तर एक प्रभाग पाच सदस्यांचा असेल. या पाच सदस्यांच्या प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 38 (बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव) सर्वात मोठा आहे, जिथे लोकसंख्या सुमारे 1,23,000 इतकी आहे.

हेही वाचा :

रोहित शर्माची क्रेझ, चाहत्यांनी…! कोच अभिषेक नायरने बनला बाॅडीगार्ड; Video Viral

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM Modi आज सुरू करणार रू. 35,440 कोटींच्या 2 बंपर योजना

‘माझा शारीरिक छळ झाला, सहा महिन्यातच मला…’; मराठी अभिनेत्रीचा अत्यंत धक्कादायक खुलासा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *