बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी नुकताच आपला 83 वा वाढदिवस साजरा केला आहे. या विशेष दिवशी अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र अभिनेत्री(actress) शिल्पा शिरोडकर यांनी दिलेल्या शुभेच्छांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनी इन्स्टाग्रामवर ‘खुदा गवाह’ या चित्रपटातील दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्या अमिताभ बच्चन आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत दिसत आहेत.

त्या पोस्टमध्ये शिल्पा यांनी लिहिलं की, ‘ज्यांच्याशी मी त्यांची चाहती असताना गुपचूप लग्न करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ज्यांच्याकडून सहकलाकार म्हणून खूप काही शिकायला मिळालं त्या व्यक्तीला म्हणजेच अमितजींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही असंच अनेक वर्षं आमच्या पडद्यावर उजळत राहा.’

1992 मध्ये प्रदर्शित झालेला ‘खुदा गवाह’ हा मुकुल एस. आनंद दिग्दर्शित आणि लिखित चित्रपट होता. यात अमिताभ बच्चन, श्रीदेवी दुहेरी भूमिकेत होते, नागार्जुन, शिल्पा शिरोडकर(actress), डॅनी डेन्झोंगपा आणि किरण कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ही कथा अफगाण योद्धा बादशाह खान (अमिताभ बच्चन) याची आहे, जो आपल्या प्रेयसी बेनझीरच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भारतात येतो. मिशन पूर्ण केल्यानंतर त्याच्यावर खोटा खुनाचा आरोप लावला जातो आणि तो भारतात कैद होतो.
हा चित्रपट त्या काळातील सर्वात महागडा भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जात होता. ‘अजूबा’ नंतर सर्वाधिक बजेट असलेला हा चित्रपट होता आणि 1992 मधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.शिल्पा शिरोडकरने अमिताभ बच्चनसोबत ‘हम’ (1991) मध्येही काम केले होते. मुकुल एस. आनंद दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत, गोविंदा, किमी काटकर, दीप साही, अनुपम खेर, कादर खान यांसारखे तारे होते.

या चित्रपटाने पुढे आलेल्या तमिळ चित्रपट ‘बाशा’ (1995) ला प्रेरणा दिली होती. आजही शिल्पा शिरोडकरसाठी अमिताभ बच्चन हे फक्त सहकलाकार नाहीत तर तिच्या स्वप्नांचा एक भाग आहेत आणि तिच्या या गोड खुलाशामुळे बिग बींच्या वाढदिवसाला आणखी एक सुंदर आठवण जोडली गेली आहे.
हेही वाचा :
पहिल्यांदाच आई झाली महिला,पण जन्माला आलेल्या बाळाला पाहून तिच्यासोबत डॉक्टरही हैराण
राज ठाकरेंचा चेहरा काँग्रेसला…’, भाजपची रोखठोक भूमिका…..
सूनेच्या खोलीत 5 दिवस होता बॉयफ्रेंड,नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर…