कोल्हापूरच्या नृसिंहवाडी येथील श्री गुरुदेव दत्तात्रयांच्या मंदिर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातील अशोक रामकिसन सौदागर (वय 38) हे रविवारी पहाटे कृष्णा नदीत (River)स्नानासाठी उतरताना पाय घसरल्याने खोल पाण्यात बुडून गेले.

अशोक सौदागर मूळचे केज, बीड येथील असून, देवदर्शनासाठी विठ्ठल-बिरदेव यात्रेतून नृसिंहवाडी येथे आले होते. मित्रांसमवेत स्नान करताना पाण्याचा अंदाज न घेता ते अचानक खोल पाण्यात गेले. उपस्थित मित्रांनी मदतीसाठी आवाज दिला, पण वेळेत त्यांना वाचवता आले नाही.
आपत्ती व्यवस्थापनातील वजीर रेस्क्यू फोर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह बाहेर काढला आणि शिरोळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय तपासानंतर शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.अशोक सौदागर हे गॅस वितरणाचे काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाने भाविकांना नदी(River) पात्रात सावधगिरी बाळगण्याचे, पायऱ्यांवर पाय घसरू न देण्याचे आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. यंदा नदीतील पाय घसरून मृत्यू झाल्याची ही दुसरी मोठी घटना नोंदवली गेली आहे.
हेही वाचा :
Metro की महाभारताचे रणांगण! प्रवाशांची तुफान मारामारी…..Video Viral
‘या’ अभिनेत्रीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत करायचं होतं लग्न, पण…
पहिल्यांदाच आई झाली महिला,पण जन्माला आलेल्या बाळाला पाहून तिच्यासोबत डॉक्टरही हैराण