महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६ सालच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी(students) ही महत्त्वाची घोषणा असून आता त्यांच्या अभ्यासाच्या नियोजनाला गती मिळणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करताना मंडळाने विद्यार्थ्यांचा ताण कमी होण्यासाठी तारखा अगोदरच प्रसिद्ध केल्या आहेत.

बारावीची लेखी परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, दि. १८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या कालावधीत माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षा देखील घेतल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार, दि. २३ जानेवारी ते सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडतील. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.
प्रत्येक विभागीय केंद्रावर आवश्यक ते सर्व शैक्षणिक आणि तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना अचूक माहिती वेळेवर मिळावी यासाठी मंडळाने सर्व परीक्षा केंद्र प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा अभ्यास नियोजित पद्धतीने व्हावा, यासाठी परीक्षा तारखा अगोदरच घोषित केल्या आहेत. विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक लवकरच मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.”
दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ दरम्यान होणार आहे. या परीक्षा सर्व विभागीय मंडळांच्या देखरेखीखाली सुरळीतपणे पार पडतील. तसेच, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा सोमवार, दि. २ फेब्रुवारी ते बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येतील.
शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा देखील याच काळात पार पडतील. विद्यार्थ्यांना याबाबत सविस्तर सूचना संबंधित शाळांमार्फत (students)दिल्या जाणार आहेत. मंडळाच्या परिपत्रकानुसार, या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन सुलभ होईल आणि ताण कमी होईल. राज्य मंडळाने शेवटी स्पष्ट केले की, “परीक्षा शांत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, यासाठी सर्व स्तरावर तयारी सुरू आहे.

विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणारे अंतिम वेळापत्रक पाहावे आणि त्यानुसार तयारी करावी.”या घोषणेने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि थोडीशी परीक्षा तणावाची चाहूल निर्माण झाली असली, तरी मंडळाने वेळेपूर्वी तारखा जाहीर केल्याने नियोजनबद्ध अभ्यासाचा मार्ग खुला झाला आहे.
हेही वाचा :
आजोबाकडून १४ महिन्यांच्या नातीवर बलात्कार…
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडला हवीये बंदूक, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा मसाला भरलेली स्टफ्ड इडली….