भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात आली असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. दिल्ली मागील 5 दिवसांपासून सुरु असलेल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 7 विकेटने विजय मिळवला(Points) आहे. यापूर्वी देखील टीम इंडियाने अहमदाबाद येथे झालेला पहिला टेस्ट सामना जिंकला होता. ज्यामुळे भारताने सीरिज खिशात घातली आहे. टीम इंडियाच्या सिरीज विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 च्या पॉईंट्स टेबलमध्ये बदल झाले आहेत.

टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट सीरिज 2-0 ने जिंकली ज्याचा फायदा भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 मध्ये मिळाला आहे. टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये नंबर ३ वरच आहे मात्र त्यांच्या विजयी टक्केवारीत बदल झालाय. दुसरा टेस्ट सामना जिंकण्यापूर्वी भारताचा विजयाचा टक्का 55.56 होता आणि त्यांचे 40 गुण होते, परंतु आता दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव केल्यानंतर भारताचा विजयाचा टक्का 61.90 पर्यंत वाढला आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या पॉईंट्स टेबलमध्ये सध्या टॉपवर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. त्यांच्या विजयाची टक्केवारी ही 100 आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ असून त्यांनी दोन पैकी १ सामना जिंकून 16 पॉईंट्स मिळवले असून त्यांच्या विजयाची टक्केवारी 66.67 आहे. तिसऱ्या क्रमांकावर(Points) टीम इंडिया असून त्यांनी 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर २ सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि १ सामना ड्रॉ झाला. टीम इंडियाचे 52 गुण आहेत आणि त्यांचा विजयाचा टक्का 61.90 आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडने पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे 26 गुण आहेत आणि त्यांचा विजयाचा टक्का 43.33 आहे. तर पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा संघ आहे.

कशी आहे WTC ची पॉईंट्स सिस्टम?

सामना जिंकल्यावर : 12 पॉईंट्स
सामना टाय झाल्यावर : 6 पॉईंट्स
सामना ड्रा झाल्यावर : 4 पॉईंट्स
सामना पराभूत झाल्यावर : 0 पॉईंट्स

दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने जबरदस्त फलंदाजी केली. यावेळी कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने शतक लगावले. भारतीय संघाने टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली होती. त्यानंतर तर वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 248 धावांवर आटोपली. वेस्ट इंडिजच्या संघाने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारताविरुद्धच्या दुसऱ्या डावात फॉलोऑन खेळला यात त्यांनी भारताच्या धावा पूर्ण करून अतिरिक्त 121 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा टेस्ट सामना जिंकण्यासाठी 121 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान टीम इंडियाने पाचव्या दिवशी 7 विकेट राखून पूर्ण केलं.

हेही वाचा :

मंत्रिमंडळ बैठकीत 3 सर्वात मोठे निर्णय, राज्याचा चेहरामोहराच बदलणार…

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती; जाणून घ्या पगार आणि पात्रता…

शिवसेना महिला नेत्याच्या नवऱ्यावर प्राणघातक हल्ला…एकनाथ शिंदेंनी घेतली रूग्णालयात भेट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *