जोगेश्वरीतील प्रभाग क्रमांक ७८ मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या माजी नगरसेविका नाझिया सोफी यांच्या पतीवर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला(attacked) केला आहे. ही घटना १३ ऑक्टोबरच्या सायंकाळी घडली असून, हल्ल्याचे कारण बीएमसीच्या कामाशी संबंधित वाद असल्याचे समोर आले आहे.अब्दुल जब्बार सोफी असे जखमी व्यक्तीचे नाव असून, हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने पालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीवर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी अब्दुल जब्बार सोफी यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले की, “या हल्ल्यामागील(attacked) आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल. कोणीही कायद्याच्या वर नाही.” पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे जोगेश्वरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी सुरक्षेची मागणी केली असून, बीएमसीशी संबंधित कामांवरून उद्भवणाऱ्या वादांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहनही केले जात आहे.
हेही वाचा :
कोल्हापूरातील गंगावेश मध्ये भाजी मंडईत घुसली चारचाकी, एका वृद्धेचा मृत्यू…
सैय्यारा फेम अहान पांडे आणि अनीत पड्डा रिलेशनशीपमध्ये….
रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी…