जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात(festival) साजरा करण्यात येतो. या सणांचा संबंध द्वापार युगाशी संबंधित आहे. यावर्षी दहीहंडीचा सण कधी साजरा करण्यात येणार आहे, त्यामागील इतिहास जाणून घेऊया

दहीहंडी हा दरवर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी उत्साहात साजरा (festival)करण्यात येणारा सण आहे. या सणाला गोकुळाष्टमी नावाने देखील ओळखले जाते. हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कृत्यांची आठवण करून देतात आणि त्यांच्याप्रमाणेच मडकी फोडून हा सण साजरा करतात. यावर्षी दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सण म्हणजे एक खेळ नाही, परंपरा नाही तर या सणाला लोकांमध्ये एकता, कठोर परिश्रम आणि उत्सवाचे प्रतीक मानले जाते. जाणून घेऊया दहीहंडीची सुरुवात कशी झाली आणि या सणामागील इतिहास आणि महत्त्व काय आहे, जाणून घ्या
कधी आहे दहीहंडी
यंदा श्रावण महिन्यामध्ये दहीहंडीचा सण शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी रात्री 9.34 वाजता सुरू होईल आणि त्याची समाप्ती रविवार, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 7.24 वाजता होईल. उद्यतिथीनुसार, दहीहंडीचा सण शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल.
दहीहंडीचा इतिहास काय आहे
श्रीकृष्णाला लहानपणापासूनच लोणी खायला खूप आवडत असे. श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह गोपींच्या घरातून लोणी चोरून खात असत. लोणी वाचवण्यासाठी गोपींनी घरातील एका उंच ठिकाणी एका भांड्यात दही आणि मिठाई बांधून ठेवण्यास सुरुवात केली. मात्र श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांसह मनोरे रचत असत आणि ते भांडे फोडून सहज लोणी मिळवत असत आणि त्यानंतर ते लोणी चोरून खात असतं. आजही लोक त्याचप्रकारे मनोरे रचतात आणि मडकी फोडून दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दहीहंडीसाठी विविध ठिकाणी बक्षिसे ठेवली जातात आणि हा उत्सव आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो.
हल्ली दहीहंडी स्पर्धा घेतली जाते त्यासाठी मोकळ्या जागेमध्ये दहीहंडी काही फूट उंच बांधली जाते. ती दहीहंडी फोडण्यासाठी महिला आणि मुली त्यावर पाणी ओतून त्यांचे प्रयत्न निष्फळ करण्याचा प्रयत्न करतात. यावेळी लोक ‘गोविंदा आला रे!’ असा जयघोष करतात.
दहीहंडीची परंपरा काय आहे?
दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या विनोदांवर आधारित असलेला एक सण. यालाच गोपाळकाला असे देखील म्हटले जाते. या दिवशी तरुण पुरुष, महिला मुली गोंविदा नावाने मनोरे तयार करुन उंचीवर टांगलेले मडके फोडण्याचा प्रयत्न करतात. हे मडके दही, लोणी इत्यादी गोष्टींच्या प्रसादाने भरलेले असते.
हेही वाचा :
AI कडून घेतला आरोग्याचा सल्ला, पठ्ठ्या ICU मध्ये भरती झाला! तंत्रज्ञान ठरले असते जीवघेणे
यामुळे महाराष्ट्र, सिंगापूरमधील संबंधांना नवीन आयाम मिळेल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
200 वर्षे भारताच्या कानाकोपऱ्यात हुकूमत गाजवणारे इंग्रज ‘या’ राज्याला कधीच गुलाम बनवू शकले नाहीत; नाव आणि कारण जाणून शॉक व्हाल