कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’ विरोधात दूध उत्पादकांनी(producers)आज (गुरुवार, १६ ऑक्टोबर) भव्य मोर्चा काढला. डी-बेंचरपोटी दूध उत्पादक आणि दूध संकलक संस्थांकडून कापून घेतलेल्या रकमेबद्दल ‘गोकुळ’कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने, शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

सकाळी सर्किट हाऊस येथून सुरू झालेल्या या मोर्चात दूध उत्पादक गायी आणि म्हशींना सोबत घेऊन ताराबाई पार्कमधील ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयाकडे गेले. या आंदोलनात मोठ्या संख्येने दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आणि सभासद सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक करत होत्या.
शौमिका महाडिक यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन संस्थेच्या विरोधात नसून, शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आहे. त्यांनी सांगितले, “डी-बेंचरपोटी कापून घेतलेली रक्कम तातडीने दूध उत्पादकांना(producers) आणि संस्थांना परत दिली जावी; अन्यथा दूध बिलाच्या दरात योग्य वाढ करावी.” या मागण्यांचे निवेदन ‘गोकुळ’ प्रशासनाला दिले जाणार आहे.या मोर्च्यामुळे ‘गोकुळ’ प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी प्रशासन काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
‘कोणाच्या बापात हिंमत नाही…’, सेटवर उशिरा जाण्याबद्दल गोविंदाने दिले स्पष्टीकरण
पुढील 72 तास धोक्याची, प्रशासनाचा मोठा इशारा…
हिरोकडं S*x ची मागणी! अनुभव सांगताना म्हणाला, ‘दिग्दर्शकाने रुममध्ये…