दिवाळी जवळ येत असताना सोने आणि चांदीच्या(Silver) दरात पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीचे दरही सातत्याने वाढत होते. चांदी सोन्यापेक्षा अधिक महाग होत असल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, आज चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज चांदीचे दर घसरले असून ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. चांदीच्या दरात आज प्रति किलोमागे ४,००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या चांदीचे दर १,८५,००० रुपये प्रति किलो इतके आहेत. १० ग्रॅम चांदी १,८५० रुपयांना तर १०० ग्रॅम चांदी १८,५०० रुपयांना मिळत आहे. या दरांमध्ये अनुक्रमे ४० रुपये आणि ४०० रुपयांची घट झाली आहे.

मागील दहा महिन्यांत चांदीच्या(Silver) किंमती जवळपास दुप्पट झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच चांदीचे दर किलोमागे २ लाखांच्या आसपास पोहोचले होते. रोजच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आज दर घसरल्याने बाजारात थोडे स्थैर्य आले आहे आणि खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, चांदीचे दर कमी झाले असले तरी सोन्याच्या भावात मात्र पुन्हा वाढ झाली आहे. प्रति तोळ्यामागे ३,३०० रुपयांनी सोन्याचा भाव वाढला असून सध्या सोन्याचे दर १,३२,००० रुपये प्रति तोळा इतके झाले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वाधिक दर मानले जात आहेत. सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, मात्र वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर परिणाम होत आहे. अनेकांनी दर आणखी कमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून दिवाळीपूर्वी शुभ खरेदी करणे शक्य होईल.
हेही वाचा :
अनैतिक संबंधांत गुरफटली, नवऱ्याला थेट नदीत फेकलं, प्रियकरासोबत…
Virat Kohli आणि Rohit Sharma अजून संपले नाहीत” 2027 विश्वचषकावर लक्ष केंद्रित
मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा..