निसान मॅग्नाइट एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय(car) ठरत आहे. जर तुम्ही या कारसाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला महिन्याला किती EMI द्यावा लागेल? याबद्दल जाणून घेऊयात.

निसान मॅग्नाइट ही एसयूव्ही भारतीय मार्केटमध्ये लोकप्रिय ठरत आहे

बेस व्हेरिएंटची किंमत ₹5.61 लाख आहे

चला या कारचा फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात

भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, (car)ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. यातही SUV सेगमेंटमधील कार्सना चांगली मागणी मिळते. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही म्हणजे Nissan Magnite.

Nissan या आघाडीच्या ऑटो कंपनीने दमदार कार ऑफर केल्या आहेत. भारतीय बाजारात Nissan कंपनीने SUV सेगमेंटमध्ये Magnite Facelift ला विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. या SUV चा बेस व्हेरिएंट Visia म्हणून सादर करण्यात आला आहे. तुम्ही जर हा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि फक्त 2 लाख रुपये डाउन पेमेंट करून ही कार घरी आणायची असेल, तर तुम्हाला दर महिन्याला किती EMI भरावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Nissan Magnite Visia किंमत

Nissan कडून Magnite Facelift चा बेस व्हेरिएंट Visia म्हणून सादर केला जातो. याची एक्स-शोरूम किंमत 5.61 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केली गेली, तर सुमारे 22 हजार रुपये रोड टॅक्स आणि 27 हजार रुपये इंश्युरन्स भरावे लागतात. त्यामुळे Nissan Magnite Visia ची ऑन-रोड किंमत अंदाजे 6.12 लाख रुपये होईल.

2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर किती EMI?

जर तुम्ही Visia व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक केवळ एक्स-शोरूम किमतीवर तुम्हाला कर्ज देईल. त्यामुळे 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उरलेली 4.12 लाख रुपयांची रक्कम बँककडून फायनान्स करावी लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांकरिता 4.12 लाख रुपये कर्ज देत असेल, तर तुम्हाला दर महिन्याला 6624 रुपये EMI भरावे लागतील.

Nissan Magnite Visia महाग होईल

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 4.12 लाख रुपयांचे लोन घेतले, तर तुम्हाला 7 वर्षांपर्यंत दर महिन्याला 6624 रुपयांचा EMI भरावा लागेल. या कालावधीत तुम्ही एकूण सुमारे 1.44 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भराल. त्यामुळे एकूण कारची किंमत सुमारे 7.56 लाख रुपये होईल.

कोणाशी आहे स्पर्धा?

भारतीय बाजारात Nissan Magnite Facelift ही Compact SUV सेगमेंट मध्ये येते. या सेगमेंटमध्ये या कारची थेट स्पर्धा Kia Sonet, Maruti Brezza, Hyundai Venue, Mahindra XUV 3XO, Tata Nexon आणि Kia Syros यांसारख्या कार्सशी आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….

राजकारण्यांची”फटाके”बाजी….

मध्यरात्री आगीचा तांडव ,सोसायटीत भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *