जगभरात कोट्यवधी लोक वापरत असलेल्या व्हॉट्सअॅपने(Whatsapp) आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे. गुरुवारी कंपनीने पासकी-बेस्ड एन्क्रिप्शन फीचर लाँच केले असून, यामुळे युजर्सची चॅट हिस्ट्री आणखी सुरक्षित होणार आहे. या नवीन फीचरमुळे आता वापरकर्त्यांना पासवर्ड किंवा एन्क्रिप्शन की लक्षात ठेवण्याची गरज नाही. त्याऐवजी फिंगरप्रिंट, फेस रिकग्निशन किंवा स्क्रीन लॉकच्या माध्यमातून चॅट बॅकअप सुरक्षित करता येईल.

आतापर्यंत युजर्सना गूगल ड्राइव्ह किंवा iCloud वर चॅट बॅकअप एन्क्रिप्ट करताना प्रत्येकवेळी वेगळा पासवर्ड टाकावा लागत होता. मात्र, नव्या अपडेटमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि सुरक्षित बनली आहे. पासकी एन्क्रिप्शन सिस्टीम युजरच्या डिव्हाइसच्या सिक्युरिटी सिस्टीमशी थेट जोडली गेली आहे, ज्यामुळे कोणालाही अनधिकृत प्रवेश करणे जवळपास अशक्य होईल.
हे फीचर पुढील काही आठवड्यांत सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. युजर्स हे फीचर सुरू करण्यासाठी सेटिंग्स → चॅट → चॅट बॅकअप → एंड टू एंड एन्क्रिप्टेड बॅकअप या पर्यायावर क्लिक करू शकतात.

व्हॉट्सअॅपनुसार, एंड टू एंड एन्क्रिप्शनमुळे युजर्सचे मेसेज आणि कॉल्स पूर्णपणे सुरक्षित राहतात. युजर आणि त्याच्याशी संवाद साधणारी व्यक्ती यांच्याशिवाय कोणीही ते मेसेज (Whatsapp)वाचू शकत नाही — अगदी व्हॉट्सअॅपलाही नाही. या नव्या फीचरमुळे व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा आपल्या युजर्सच्या प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटीला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
गुंतवणूदारांनो आज सावध राहा! तज्ज्ञांनी दिलाय इशारा
सांगलीत मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केला…
शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल
