YouTube वर आता जुन्यात जुना आणि कमी क्वालिटीचा व्हिडिओदेखील हाय-क्वालिटीमध्ये दिसणार आहे. यासाठी YouTube लवकरच एक नवीन फीचर आणत आहे, ज्याला अनेकजण प्लॅटफॉर्मचे सर्वात मोठे फीचर(feature) मानत आहेत. YouTube लवकरच AI पॉवर्ड ‘सुपर रिझोल्यूशन’ अपस्केलिंग टूल लाँच करत आहे. या टूलमुळे कोणताही जुना किंवा कमी रिझोल्यूशनवर अपलोड झालेला व्हिडिओ एकदम हाय-क्वालिटीचा होईल. निर्मात्यांना हवे असल्यास ते या फिचरमधून ‘ऑप्ट-आउट’ करण्याचा पर्याय निवडू शकतील.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये होत असलेल्या विकासामुळे आता कोणत्याही जुन्या आणि कमी क्वालिटीच्या व्हिडिओची गुणवत्ता वाढवणे शक्य झाले आहे. यासाठी खास मॉडेल डिझाइन केले जाते, जे पॅटर्न रिकग्निशन अल्गोरिदमचा वापर करून इमेज आणि व्हिडिओमधील तपशील वाढवते. हे फीचर आल्यानंतर YouTube वर असलेले सगळे व्हिडीओ अपस्केल केले जातील, ज्यामुळे ते अधिक शार्प आणि तपशीलवार दिसतील. याचा सर्वात जास्त परिणाम टीव्हीसारख्या मोठ्या स्क्रीन्सवर दिसेल.
युजर्स हेदेखील पाहू शकतील की एखादा व्हिडीओ अपस्केल्ड रिझोल्यूशनवर चालत आहे की नाही. त्यांना मूळ रिझोल्यूशनवर व्हिडीओ पाहण्याचा (feature)पर्यायही उपलब्ध असेल. सध्या हे फीचर १०८०p पेक्षा कमी रिझोल्यूशनवर अपलोड झालेल्या व्हिडिओंसाठी रोल आऊट केले जात आहे. लवकरच HD व्हिडिओंनाही अपस्केल करण्याचा पर्याय येईल.

YouTube वर आता जुगार आणि हिंसक गेमिंगशी संबंधित कंटेटचे नियम अधिक कठोर होणार आहेत. Google च्या मालकीच्या या प्लॅटफॉर्मने सांगितले आहे की, १७ नोव्हेंबर २०२५ पासून ते NFTs (नॉन-फंजिबल टोकन्स) सारख्या डिजिटल वस्तूंसोबत जुगाराचे व्हिडीओ प्रतिबंधित करेल. तसेच, कॅसिनो-शैलीतील किंवा हिंसक गेमिंग असलेल्या कंटेटवर वयोमर्यादा लागू केली जाईल.
हेही वाचा :
इचलकरंजीत गॅस गिझरचा भीषण स्फोट…दाम्पत्य गंभीर जखमी
10 वर्षात करोडपती होणं शक्य… SIP नाही Step up SIP निवडा,महिन्याला किती गुंतवायचे
दोन पत्नी असल्यास पेंशन कोणाला मिळणार लाभ?; नवे नियम जारी