अनेक धक्कादायक गोष्टी सोशल मिडियावर व्हायरल होत असतानाच इथे आणखीन एका संतापजनक घटनेची नोंद झाली आहे. घटना सिंधुदुर्गमधील बांदा येथून समोर येत असून इथे ओंकार हत्तीला सुतळी बाॅम्बने हल्ला करण्याची घटना घडून आली आहे. “ओंकार हत्ती” हे एकरानटी हत्ती (elephant)आहे जो सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या सीमेवर फिरतो. हा हत्ती तुळसाण येथील नदीत आंघोळ करत असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडून आला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्यांनी सर्वांनाच हादरवून सोडले आहे. चला व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

माहितीनुसार, असं सांगण्यात आलं आहे की, ओंकार हत्ती(elephant) नदीच्या पाण्यात आंघोळीचा आनंद लुटत होता आणि याचवेळी विरुद्ध दिशेने त्याच्या अंगावर काही सुतळी बॉम्बचा मारा करण्यात आला. या फटाक्यांचा आवाज आणि स्फोट पाहताच हत्ती घाबरला. व्हिडिओमध्ये हत्ती सुतळी बाॅम्बचा हल्ला होताच भेदरुन जंगलात जाताना दिसून येतो. ही घटना बांदा येथे घडून आली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून आता यूजर्सद्वारे घटनेवर संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मुक्या जनावरांसोबत अशी क्रुर घटना घडणे काही नवीन राहिलं नाही. याआधीही माणसांनी प्राण्यांच्या जीवावर हल्ला करुन त्यांच्या जीवाशी खेळू पाहिलं आहे ज्यामुळे यूजर्स आता संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहेत. माणसांची माणूसकी संपत आहे आणि क्रुरता किती वाढत चालली आहे याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून घेता येते.

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @KhaneAnkita नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “निच व्यक्तीला फटकून काढल पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुक्या प्राण्यावर ती असे फटाके टाकू नका हत्ती जर खवळला तर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “फेकण्यामागचं कारण काय?”.

हेही वाचा :

थंडीच्या दिवसांमध्ये कफ वाढवणाऱ्या ‘या’ पेयांचे अजिबात करू नका सेवन

Realme GT 8 Pro युजर्ससाठी घेऊन येणार एक खास सरप्राईज, या दिवशी भारतात होणार लाँच

नगरपरिषद इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्यानं संपवलं आयुष्य

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *