मागील काही वर्षांमध्ये भाजपनं ज्या इलेक्टीव्ह मेरिटला प्राधान्य दिलं तोच पॅटर्न आणि एक नवी चाल पक्ष मुंबईतील पालिका निवडणुकींसाठी(Election) आजमावत असल्याची बाब समोर आली आहे. उमेदवारानं यापूर्वी काय काम केलं, प्रभागामध्ये असणारं काम या सर्व गोष्टींची गोळाबेरिज भाजप करणार असून त्याच धर्तीवर आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी देणार आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजपकडून तरुण उमेदवारांना अधिकाधिक संधी दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं शिवसेनेला हा पक्ष चांगलीच टक्कर देताना दिसेल.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा (Election)निकाल पाहिलं असता लोकसभा निवडणुकीच्या निकालात पक्षाला मोठा धक्का सोसावा लागला होता, मुंबईत पक्षाची पिछेहाट झाली होती. विधानसभा निवडणूक मात्र यास अपवाद ठरली होती. या निवडणुकांमध्ये प्रभागांमध्ये तळागाळाच्या स्तरावर जाऊन तिथं कशा पद्धतीनं काम झालं आहे, प्रभागांमध्ये कशी आघाडी किंवा पिछेहाट झाली आहे याची आकडेवारी विचारात घेतली जाणार आहे.एका वॉर्डमध्ये भाजपनं तीन निरीक्षक नेमले असून, त्यांच्याकडून नगरसेवकांची नावं पुढे येत असून त्यांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. भाजप सातत्यानं अशी सर्वेक्षणं करताना दिसत आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुका तोंडावर असतानाच महापालिकेच्या निवडणुकीसाठीसुद्धा भाजपनं शिवसेनेच्या ठाकरे पक्षाप्रमाणंच कंबर कसली असून, तरुणाईला संधी देण्याचा विचार केल्याचं स्पष्ट होत आहे.नगरसेवक असताना वॉर्डमध्ये पाडलेला प्रभाव आणि पक्षाने दिलेले विविध कार्यक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तीला निवडणुकीचं तिकीट मिळणार असून, तरुण चेहऱ्यांकडे भाजपचं विशेष लक्ष असेल त्यामुळं यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :
अतिशय अश्लील आणि…, मलायका अरोराचा डान्स पाहून सर्वत्र संतापाची लाट
सोनं १०,००० तर चांदी २१,००० नी झालं स्वस्त…
नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर टाकला सुतळी बॉम्ब, हादरवणारी दृश्ये अन् Video Viral