उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसेची धक्कादायक घटना घडली आहे. भाजप(leader) अंबेहटा मंडळाचे उपाध्यक्ष सुनील कोरी यांच्या वडिलांची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. टीडौली गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव धर्मसिंह कोरी (वय ६५) असून, ते गावातील आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखले जात होते.

सुनील कोरी यांनी सांगितले की, सकाळी त्यांच्या पत्नी सुनीता यांनी पाहिले असता धर्मसिंह कोरी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. हे पाहून घरातील सर्वजण हादरून गेले आणि तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू केला आहे.

मुलाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री अडीचच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता आणि त्याचवेळी फटाक्यांसारखा मोठा आवाज आला. लग्नसोहळा सुरू असल्याने कोणी त्याकडे लक्ष दिले नाही, मात्र सकाळी उठल्यानंतर घरात भीषण वास्तव उघडकीस आले. धर्मसिंह कोरी यांच्या हत्येमागे(leader) नेमके कोणते कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

Weight loss साठी सोपा उपाय! रोजच्या आहारात नियमित खा भोपळ्याच्या बियांची चटणी

आगीशी खेळणं तरुणीला महागात पडलं! तोंडातून निघू लागल्या ज्वाला, लोकांनी मारून मारून विझवली आग; Video Viral

BMC Election साठी भाजपनं कंबर कसली; नवा पॅटर्न, नवी चाल…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *