नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुका(elections)जाहीर झाल्यानंतर स्थानिक पातळींवर अनेक पक्ष युती आणि आघाडी करत आहेत. कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली होती. उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. भाजपाला शह देण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरेंना सांगण्यात आलं. तसंच स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची माहितीदेखील देण्यात आली. मात्र उद्धव ठाकरेंनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग मधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीत(elections) पक्षाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत जावं असा प्रस्ताव उद्धव ठाकरेंसमोर ठेवण्यात आला. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव ठेवला. मात्र या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सिंधुदुर्गमधील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर ठेवला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या समीकरणाची माहिती घेतल्यानंतरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपाला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं आणि त्यासंबंधी स्थानिक पातळीवर चर्चा केल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आली. शिवाय ही शहर विकास आघाडी का महत्त्वाची आहे यासंबंधी सुद्धा माहिती संदेश पारकर वैभव नाईक व इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. मात्र याबाबत कुठलाही निर्णय न देता उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत – 21 नोव्हेंबर
मतदान – 2 डिसेंबर
मतमोजणी – 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल – 10 डिसेंबर
विभागनिहाय नगरपरिषद – नगरपंचायत निवडणुका
कोकण – 27
नाशिक – 49
पुणे – 60
छत्रपती संभाजीनगर – 52
अमरावती – 45
नागपूर – 55

हेही वाचा :
मोबाईल वापरकर्त्यांनो तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला तर सावध व्हा
दिल्ली “10/11′ चा हल्ला तपास ऑपरेशन””डॉक्टर””
रिझर्व बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! सर्वसामान्यांसाठी ‘हे’ नवीन नियम लागू होणार