बॉलिवूडच्या तेजस्वी अध्यायाचा आज दुर्दैवी अंत झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलीवुडचे “ही-मॅन” म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन(Death) झालं आहे. काही दिवसांपासून प्रकृती अत्यंत बिघडल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही स्थिती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने देओल कुटुंबाने त्यांचा पुढील उपचार घरी करण्याचा निर्णय घेतला. अखेर आज, २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली.

जुहू येथील स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असून देओल कुटुंबासह अनेक चाहते, सहकलाकार आणि इंडस्ट्रीतील मान्यवर त्यांना अंतिम निरोप (Death)देण्यासाठी जमले आहेत. धर्मेंद्र यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने केवळ एक महान अभिनेतेच नाही तर विनयशील, प्रेमळ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावलं आहे.
धर्मेंद्र यांनी सहा दशकांच्या कारकिर्दीत शोले, बर्निंग ट्रेन, जीने नहीं दूंगा, धर्म और कानून अशा असंख्य चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अलीकडेच त्यांच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांचा शेवटचा चित्रपट इक्कीस डिसेंबरमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे, मात्र त्याच्या रिलीजआधीच त्यांच्या जाण्याने चाहत्यांच्या भावना व्यथित झाल्या आहेत.
धर्मेंद्र यांच्या पश्चात पत्नी हेमा मालिनी, सनी देओल, बॉबी देओल, ईशा, अहाना, विजेता आणि अजीता हे कुटुंब आहे. देओल कुटुंबासाठी हा भावनिक क्षण असून संपूर्ण देशातून श्रद्धांजलीचा वर्षाव सुरू आहे.
धर्मेंद्र—एक नाव, एक युग, एक भावना…
त्यांनी सोडलेली परंपरा, त्यांची शैली आणि त्यांचे सिनेसृष्टीतील योगदान सदैव स्मरणात राहील.

हेही वाचा :
विशालकाय माशाने चक्क जिवंत माणसाला गिळलं, अर्धे शरीर आत तर अर्धे बाहेर… Video Viral
सेलमध्ये या 5 स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डिल्स, ऑफर्स पाहून व्हाल हैराण
राष्ट्रवादीला संधी द्या; हातकणंगलेचा स्वर्ग करू व चेहरा बदलू – मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास