ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते (actor)आणि चित्रपटसृष्टीत ‘ही-मॅन’ अशी ओळख मिळवलेल्या धर्मेंद्र यांचं सोमवारी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. बऱ्याच काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजणारे धर्मेंद्र यांना याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांची प्रकृती बिघडल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देऊन घरीच त्यांच्यावर उपचार केले जात होते. 24 नोव्हेंबर रोजी त्यांची प्रकृती अचानक पुन्हा बिघडली आणि दुपारच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला. अचानक त्यांच्या घरातून रुग्णवाहिका बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या निधनाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं अन् या बातमीने संपूर्ण देश, चित्रपटसृष्टी आणि लाखो चाहत्यांना धक्काच बसला.

धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन सृष्टीला धक्का बसला असून त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सोशल मीडियावरुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देताना दिसत आहेत. धर्मेंद्र यांचं पार्थिव विलेपार्लेमधील स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिथे त्यांचे जीवलग मित्र अमिताभ बच्चन दाखल झाले होते. जवळजवळ 50 वर्षांपूर्वी ‘शोले’ चित्रपटात धर्मेंद्रसोबत काम केलेले अमिताभ बच्चन या बातमीमुळे खिन्न झाले आहेत. त्यांच्यासाठी, धर्मेंद्र हे केवळ सह-कलाकार नव्हते, तर कुटुंबासारखे होते आणि त्यांचे जाणे हे बिग बींसाठी एक मोठे वैयक्तिक नुकसान आहे. धर्मेंद्र कायम त्यांचा उल्लेख माझा छोटा भाऊ असा करायचे.
शोलेच्या रिलीजच्या 50 वर्षांनंतर 24 नोव्हेंबर 2025 ला आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या जय-वीरूची जोडी कायमची तुटली. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला अमिताभ(actor) हे स्मशानभूमीत सर्वात आधी पोहोचलेल्या मोजक्या सेलिब्रिटींपैकी एक होते. मुलगा अभिषेकसह धर्मेंद्र यांच्या अंत्यविधीला पोहोचलेले अमिताभ बच्चन रात्रभर त्यांच्या मित्राच्या आठवणीत भावूक झालेले. त्यांनी पहाटे अडीच वाजता आपल्या एक्स अकाऊंटवरुन धर्मेंद्र यांच्यासाठी खास पोस्ट केली. धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना अमिताभ यांनी निवडलेल्या शब्दांमध्ये त्यांच्या दु:खाचा अंदाज बांधता येतो. शब्दांत त्यांचे दुःख व्यक्त केले.
“आणखी एक धाडसी दिग्गज आपल्याला सोडून निघून गेला. तो स्टेज सोडून गेला आहे. तो एक शांतता मागे सोडून गेला आहे. एक शांतता जी सहन करणे खूप कठीण आहे. धरमजी म्हणजे महानतेचे एक प्रतीक, केवळ व्यक्ती म्हणून त्यांच्या महानतेसाठी नव्हे तर त्यांच्या मोठ्या हृदयासाठी (मनासाठी) आणि साधेपणासाठी देखील ओळखले जायचे,” असं म्हणत अमिताभ यांनी आपल्या पोस्टची सुरुवात केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे, “पंजाबच्या ज्या गावातून ते आले होते त्या गावाच्या मातीचा सुगंध त्यांच्यासोबत आणला आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते त्या निसर्गाशी प्रामाणिक राहिले,” असं म्हटलं आहे. “मनोरंजन हे एक असे क्षेत्र जे प्रत्येक दशकात बदलत गेले. चित्रपट उद्योग बदलला, पण ही व्यक्ती कधीही बदलली नाही. त्याचे हास्य, त्याच्याबद्दल वाटणारं आकर्षण आणि त्याच्या भेटीतील ऊर्जा त्याच्या सभोवतालच्या प्रत्येकापर्यंत पोहोचली. हे असं उदाहरण या व्यवसायात दुर्मिळ आहे. आमच्यात जे काही होतं ते सारं रिकामं झालं आहे. त्यांच्या जाण्याने आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली असून ती नेहमीच राहील,” असं म्हटलं आहे.मुख्य नायक म्हणून अमिताभ आणि धर्मेंद्र यांनी ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘राम बलराम’ आणि ‘नसीब’ या चार चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

हेही वाचा :
इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात
मास्तर! तुमची यत्ता कंची?
तुमची पर्सनल माहिती कळणार नाही, नव्या आधार अॅपचे ‘हे’ फीचर वापरा