शहरातील 252 कोटी रुपयांच्या मोठ्या ड्रग्ज(drug) घोटाळ्याने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. या प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान अवत्रमणी उर्फ ऑरी याला मुंबई पोलिसांनी समन्स जारी केले आहे. अँटी नार्कोटिक्स सेलच्या तपासात नवीन धागेदोरे मिळाल्यानंतर ऑरीला चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.अँटी नार्कोटिक्स सेलच्या घाटकोपर युनिटकडून ऑरीला पाठवलेल्या नोटीसमध्ये आज दुपारी १ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑरी हा सेलिब्रिटी पार्टी कल्चर, इव्हेंट्स आणि महागड्या लाइफस्टाइलमुळे सोशल मीडियावर परिचित चेहरा आहे, त्यामुळे याच घटनेमुळे मोठी चर्चा सुरु झाली आहे.

या प्रकरणाचा थेट संबंध मोठ्या प्रमाणात पकडलेल्या ड्रग्ज कन्साइनमेंटशी आहे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहैल शेख या आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तो देशात आणि परदेशात उच्चभ्रू लोकांसाठी खासगी ड्रग्ज पार्ट्या आयोजित करत होता, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा केला जात होता.तपासात आरोपीने काही महत्त्वाची नावे पोलिसांसमोर घेतल्याचे सांगितले आहे, त्यात ऑरीचे नावही असल्याचे समोर आले आहे. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी अँटी नार्कोटिक्स सेलने ऑरीला चौकशीसाठी बोलवले आहे.
ऑरी सोशल मीडियावर गेल्या काही वर्षांत अत्यंत प्रभावी ठरला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत त्याचे जवळचे संपर्क, मोठमोठ्या पार्ट्या आणि विदेशातील इव्हेंट्स यामुळे तो वारंवार चर्चेचा विषय ठरत असतो. त्यामुळे पोलिसांनी त्याला समन्स बजावल्यामुळे प्रकरणावर अधिक लक्ष वेधले गेले आहे.पोलिस तपास कोणत्या दिशेने वळतो, ऑरीने सहभाग नाकारला की काही महत्त्वाच्या गोष्टी कबूल केल्या, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अँटी नार्कोटिक्स सेल सर्व संबंधित व्यक्तींवर लक्ष ठेवून चौकशी करत आहे.
विशेष म्हणजे, या मोठ्या ड्रग्ज जाळ्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. आरोपी मोहम्मद सलीम परदेशातील ड्रग्ज(drug) पुरवठादारांशी थेट संपर्कात असल्याचा संशय आहे, त्यामुळे पुढील चौकशीत अधिक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.सध्या ऑरीने या समन्सवर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र सोशल मीडियावर विविध चर्चा आणि मीम्सची रेलचेल सुरू आहे. पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष घेणे अजून शक्य नाही.

हेही वाचा :
लग्न टळल्यानंतर स्मृतीने उचललं मोठं पाऊल, इन्स्टावर पलाशला केलं अनफॉलो
लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री शिदेंनी केलं मोठं विधान; म्हणाले…
कोण आहे Mary D’Costa? जिने स्मृती-पलाशच्या नात्यात कालवले विष