अभिनेते (actor)धर्मेंद्र यांचे आज सोमवारी निधन झाले आहे. चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बॉलीवूडचे आज मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत ठीक नव्हती. दरम्यान आज त्यांचे दुख:द निधन झाले आहे. धर्मेंद्र यांनी बॉलीवूडला शोले, धरम वीर, सीता और गीता, यमला पगला दीवाना आणि लोफर असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांच्यावर विले पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली आहे.धर्मेंद्रजी यांच्या जाण्याने बॉलीवूड इंडस्ट्रीमधील एका युगाचा आज अंत झाला. ते एक प्रसिद्ध कलाकार होते. ते एक जबरदस्त अभिनेते होते. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका या लाखों लोकांच्या मनाला भिडल्या.
धर्मेंद्रजी(actor) हे साधेपणा, नम्रपणा आणि प्रेम यासाठी ओळखले जायचे. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या प्रार्थना त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांसोबत आहेत.
धर्मेंद्र यांनी जिंकले ‘हे’ पुरस्कार
धर्मेंद्र यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान
सिनेमातील योगदानाबद्दल धर्मेंद्र यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये, त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता. ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या नावावर मोठा विक्रम तयार केला.
फक्त पद्मभूषणच नाही तर, धर्मेंद्र यांनी जिंकले ‘हे’ पुरस्कार; हिट चित्रपट देऊन मोडला स्वतःचाच रेकॉर्ड
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
“घायल” हा चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला होता. यात धर्मेंद्र, सनी देओल, मीनाक्षी शेषाद्री, ओम पुरी आणि अमरीश पुरी यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाला 1990 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला.

आजही अंगावर शहारे आणतात धर्मेंद्र यांचे ‘हे’ डायलॉग
१९७३ मध्ये ‘यादों की बारात’ या चित्रपटात धर्मेंद्रचा संवाद, “कुत्ते, कमीने, मैं तेरा खून पी जाऊंगा” हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला. नासिर हुसेन दिग्दर्शित या चित्रपटात धर्मेंद्रने विजय अरोरा, तारिक आणि झीनत अमान सारख्या कलाकारांसह भूमिका केल्या होत्या.
शोलेमधील आणखी एक मजेदार डायलॉग येतो जेव्हा वीरू दारूच्या नशेत पाण्याच्या टाकीवर चढतो आणि गावकऱ्यांसाठी एक नाट्यमय वातावरण निर्माण करतो. तो म्हणतो, “गावकऱ्यांनो, तुम्हाला माझा शेवटचा सलाम… गुडबाय…” और फिर जोड़ता है, “इस स्टोरी में इमोशन है, ड्रामा है, ट्रेजेडी है…”असे अनेक डायलॉग अभिनेते धर्मेंद्र यांचे प्रसिद्ध आहेत जे अनेक पिढ्यांनाही लक्षात राहतील.

हेही वाचा :
“बाबा वेंगांनी सांगितलंय: 2026 हे वर्ष बदलणार तुमची दुनिया!”
EPFO मध्ये मोठा बदल होणार, 1 कोटी नोकरदारांना होणार फायदाचं फायदा
७ तारखेपर्यंत पगार न दिल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते