भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी आणि डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने राज्य हादरले आहे. गौरीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असली तरी कुटुंबीयांनी या प्रकारावर संशय व्यक्त केला आहे. या संपूर्ण घटनेत गौरीची आई समोर आली आणि तिच्या वेदनेने संपूर्ण महाराष्ट्राचे मन पिळवटून टाकले(leader).गौरीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी अनंत गर्जेसह अजय गर्जे आणि शीतल आंधळे यांच्यावर गंभीर आरोप करत योग्य ती चौकशी आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र या सर्वातून तिच्या आईचे एक वाक्य सर्वात जास्त बोलले जात आहे, “तू खरं बोललास तर मी तुला माफ करेन…!”

गौरीच्या आईने स्पष्टपणे सांगितले की, जर ही आत्महत्या होती, तर शरीर हलवले का? ते तसेच का ठेवले नाही? तू डॉक्टर नसूनही हात लावण्याचा अधिकार तुला कोणी दिला? या प्रश्नांमुळे प्रकरण आत्महत्येचे नसून काहीतरी वेगळे असण्याची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.त्या म्हणाल्या, “माझ्या मुलीने आत्महत्या केली असती तर आम्ही येईपर्यंत तिला तसेच ठेवायला हवे होते. पण तसे झाले नाही. हेच संशय निर्माण करते.”
पत्रकारांनी विचारले की पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क झाला का? यावर गौरीची आई भावुक होत म्हणाल्या, “आम्ही त्यांच्याशी संपर्क का करावा? माझं लेकरू गेलंय. आम्हाला फक्त न्याय हवा आहे.”, तिच्या या शब्दांनी राजकारण, सत्ता आणि संवेदना यामधील दरी स्पष्ट झाली आहे.गौरी गर्जे यांच्या आईने स्पष्ट इशारा(leader) दिला आहे की न्याय न मिळाल्यास ती शांत बसणार नाही. त्या म्हणाल्या, “जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही तर मी वरळी पोलीस स्टेशनसमोर फाशी घेईन.” त्यामुळे आता हा इशारा केवळ भावनिक उद्रेक नाही, तर न्यायव्यवस्थेला दिलेला ठोस संदेश आहे.

हेही वाचा :
महायुतीतल्या वादावर एकनाथ शिंदे यांचे मोठे विधान, केले 2 मोठे गौप्यस्फोट!
स्मृतीच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? तब्येतीबाबत मोठे अपडेट समोर
DJ वर थिरकली आज्जींची कंबर, जबरदस्त फ्लिपसह केला असा डान्स… पाहून सर्वच झाले घायाळ; Video Viral