स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीत (Mahayuti)असलेली गोंधळाची चर्चा आता स्पष्ट करण्यात आली आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत महायुतीतील धोरण आणि पक्षातील नियमांची सविस्तर माहिती दिली.शिंदे यांनी सांगितले की, प्रचाराच्या कामात शिवसेना आघाडीवर आहे. काही ठिकाणी भाजपाशी, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती असून, लोकांना स्थानिक पातळीवरील विकासावर भर देत मैत्रीपूर्ण आणि सकारात्मक प्रचार करायचा हा महायुतीचा धोरण आहे.

शिवसेनेत मित्रपक्षांचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते प्रवेश करणार नाहीत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. “काही ठिकाणी काँग्रेस आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार होते. त्यामुळे मित्रपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आमच्या पक्षात प्रवेश देऊ नका, अशी सूचना मी माझ्या कार्यकर्त्यांना दिली आहे,” असे शिंदे म्हणाले.
दिल्ली भेटीबाबतही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री अमित शाहांशी भेटीत काही तक्रार करण्याचा विषय नव्हता. बिहारमधील शपथविधीसाठी बोलावल्यामुळे त्यांनी दिल्लीला भेट दिली आणि नंतर बिहारला गेले. “आम्ही एनडीएचे घटकपक्ष आहोत. स्थानिक पातळीवरील विषय मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र बसून सोडवतो,” असे शिंदे म्हणाले.
या स्पष्टिकरणामुळे महायुतीतील(Mahayuti) नाराजीविषयक चर्चा आणि पक्ष प्रवेशाच्या अफवांवर विराम लागेल, आणि निवडणुकीच्या प्रचारावर अधिक लक्ष केंद्रित होईल.

हेही वाचा :
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा…
‘आम्ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त…’, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण
अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू