2 ऑगस्ट 2027 रोजी जगभरातील खगोलप्रेमींना एक अद्भुत घटना अनुभवायला मिळणार आहे. 21व्या शतकातील सर्वात दीर्घकाळ टिकणारे पूर्ण सूर्यग्रहण (solar eclipse)तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद चालणार असून दिवसा मध्यरात्रीसारखा अंधार पसरलेला असेल. शास्त्रज्ञांच्या मते, असे ग्रहण पुढील 100 वर्षांत पुन्हा दिसणे कठीण आहे.

चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकणार

ग्रहणाच्या पूर्ण अवस्थेत चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल. त्यामुळे सूर्याचा प्रकाश पूर्णपणे क्षीण होऊन दिवसा तारे, शुक्र आणि बुध ग्रह देखील दिसू शकतील. सूर्याच्या भोवती दिसणारा कोरोना देखील त्या काळात स्पष्टपणे पाहता येईल.

तापमान 10 अंशांनी घसरण्याची शक्यता

ग्रहणादरम्यान वातावरणात अचानक बदल होणार आहेत—

तापमानात 8–10 अंशांची घट

वाऱ्याची दिशा बदलणे

पक्षी, प्राणी आणि कीटकांच्या वर्तनात बदल

हे सर्व निरीक्षण खगोलशास्त्र, जीवशास्त्र आणि वातावरणशास्त्रासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.

खगोलशास्त्रज्ञांसाठी ‘नैसर्गिक प्रयोगशाळा’

जगभरातील संशोधन संस्था, वेधशाळा आणि NASA या घटनेला थेट वैज्ञानिक प्रयोगशाळा मानून अभ्यास करणार आहेत. ग्रहण सुरू होण्याच्या जवळपास 60–89 मिनिटे आधी सूर्याच्या(solar eclipse) कडेला चंद्राची सावली दिसू लागेल आणि तेज हळूहळू कमी होत जाईल.

काही देशांत शाळा बंद होण्याची शक्यता

प्रचंड उत्सुकता आणि काळजी लक्षात घेता काही देशांमध्ये त्या दिवशी शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत चर्चा सुरू आहे.

कोणत्या देशांत ग्रहण दिसेल?

हे दुर्मिळ सूर्यग्रहण प्रामुख्याने आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोपच्या काही भागांत पूर्णपणे दिसणार आहे.भारतामध्ये काही राज्यांत आंशिक सूर्यग्रहण दिसणार आहे, मात्र ते खूप मर्यादित असेल.

पुढील असा अंधार 22व्या शतकातच!

NASA च्या नोंदीनुसार, इतका दीर्घकाळ टिकणारा पूर्ण अंधार पुन्हा 22व्या शतकात दिसेल. त्यामुळे 2 ऑगस्ट 2027 ची घटना ही या पिढीतील सर्वात मोठं खगोलीय आकर्षण मानली जात आहे.

हेही वाचा :

शिंकताना आपले डोळे आपोआप का बंद होतात…

प्लास्टिकच्या पिशवीपासून बनवला शॉवर अन् चिमुकल्याचा जल्लोष पाहून इंटरनेटही झालं भावूक, पहा VIDEO

252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ऑरीला पोलिसांचे समन्स; आज दुपारी चौकशी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *