बॉलिवूड(Bollywood news) अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती अनेक वर्षे चर्चेत राहिली. पण आता मलायका अरोराचे नाव पुन्हा एकदा एका मिस्ट्री मॅनसोबत जोडले जात आहे. अलीकडेच, ती तिच्या मिस्ट्री मॅनसोबत विमानतळावर दिसली.

आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये मलायका अरोरा विमानतळावर पूर्णपणे कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिच्यासोबत मास्क घातलून चेहरा न दाखवणारा एक मुलगा दिसला. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत आणि या गूढ व्यक्तीबद्दल सर्वजण अंदाज लावत आहेत.

हा व्हिडिओ सोशल(Bollywood news) मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. अनेकांनी अभिनेत्रीच्या लव्हलाईफबद्दल बोलले, तर काहींनी असे सुचवले की हा तोच कॉन्सर्टमधील माणूस आहे ज्याच्यासोबत मलायका अरोराचा व्हिडिओ याआधी देखील व्हायरल झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये, तिचा गूढ माणूस अभिनेत्रीला पाहताना दिसत आहे.

जवळजवळ सर्व नेटकऱ्यांनी कमेंट केली की हा माणूस तोच व्यक्ती आहे ज्याच्यासोबत अभिनेत्री कॉन्सर्टमध्ये दिसली होती. दरम्यान, दुसऱ्या नेटकऱ्याने त्या माणसाचे नावही उघड केले. त्या तरुणाची ओळख हर्ष मेहता अशी आहे. त्याचं वय अवघ 33 वर्ष असल्यामुळे काही नेटकरी मलायकावर टीकादेखील करत आहेत.

हर्ष मेहता हा डायमंड मर्चंन्ट असून गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघाना एकासोबत स्पोट केलं जात आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेत्या गायक एनरिक इग्लेसियसचा एक कॉन्सर्ट मुंबईत आयोजित करण्यात आला होता. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायका रुमर्ड बॉयफ्रेंड हर्ष मेहता या कॉन्सर्टमध्ये मस्ती करताना दिसली. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

हेही वाचा :

निवडणूक कार्यकर्त्यांची, पण उमेदवारी अर्जासाठी रेट ठरले; कोणता पक्ष किती रक्कम घेतो?

पालकांनो मुलांच्या भविष्यासाठी LIC ची ‘ही’ योजना आहे सर्वात बेस्ट! जाणून घ्या फायदे

मतदार यादीत गोंधळ वाढला! इचलकरंजीत चार मतदार सहाय्यता केंद्रे सुरू; नागरिकांची धावपळ वाढली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *