दक्षिण भारतीय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि दिग्दर्शक-निर्माता राज निदीमोऱू (remarried)यांनी सोमवारी सकाळी अत्यंत गुप्तपणे विवाह केल्याची खात्रीची माहिती समोर आली आहे. हा विवाहसोहळा कोयंबटूरमधील ईशा योग केंद्रातल्या लिंग भैरवी मंदिरात पार पडला. या समारंभाला फक्त जवळचे आणि निवडक असे एकूण ३० पाहुणे उपस्थित होते, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे.सूत्रांनुसार, सामंथाने विवाहासाठी लाल रंगाची पारंपरिक साडी नेसली होती.

लग्नाच्या काही तासांपूर्वीच राज निदीमोऱू यांच्या माजी पत्नी (remarried)श्यामली दे यांनी इंस्टाग्रामवर “हताश लोक अतिशय विचित्र गोष्टी करतात” अशी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली.सामंथा आणि राज यांच्या नात्याच्या चर्चांना आधीपासूनच सोशल मीडियावर उधाण आले होते. २०२४ पासूनच दोघे एकत्र दिसत असल्याच्या बातम्या आणि चर्चांनी सुरु होत्या .

सामंथानेही काही काळापूर्वी राज सोबतचे फोटो (remarried)आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत शेअर केले होते, यामुळे या चर्चांना अधिक चालना मिळाली.सामंथा पूर्वी अभिनेता नागा चैतन्य यांच्यासोबत लग्न केले होते पण, त्यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला. तर राज निदीमोऱू यांचे त्यांच्या पूर्व पत्नी श्यामली दे सोबत २०२२ मध्ये घटस्फोट झाला. राज हा प्रसिद्ध दिग्दर्शक असून त्याची फॅमिली मॅन ही वेब सिरीज प्रचंड गाजत आहे.
हेही वाचा :
इतके स्वस्त कुठेच नाही, Jio चे 3 स्वस्त प्लॅन्स, JioHotstar फ्री बघा,
युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाई सुप्रिया सुळेंचा जोरदार डान्स अन्
शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! ‘या’ ४ दिवशी सर्व