राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इचलकरंजी महापालिकेच्या(Ichalkaranji)सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात चार विभागीय कार्यालयांमध्ये मतदार सहाय्यता केंद्रे सुरू केली आहेत. मतदार यादीतील विविध तक्रारी, नाव शोधणे, दुरुस्ती, नाव वगळणे किंवा नव्याने समाविष्ट करणे, या सर्व बाबींवर तत्काळ मार्गदर्शन करण्यासाठी ही केंद्रे काम करणार आहेत.या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त नंदू परळकर यांनी केले. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत.

इचलकरंजीत मतदार यादीचा गोंधळ शिगेला एका गल्लीतील सर्वच मतदार दुसऱ्या प्रभागात, (Ichalkaranji)नागरिक आणि इच्छुकांचा संताप!मात्र, या याद्या फोडतांना तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणात झाल्याचे समोर येत आहे. अनेक मतदारांच्या प्रभागाची आदलाबदल झाली आहे. त्यामुळे इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. आयोगाने मतदार याद्यांवर हरकती दाखल करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

आयोगाच्या आदेशानुसार आता शहरात चार ठिकाणी मतदार सहाय्यता केंद्र सुरू केली आहेत.(Ichalkaranji) त्यासाठी प्रभागांची फोड केली आहे. मतदारांनी आपल्या प्रभागानुसार संबंधित केंद्रावर जाऊन आवश्यक ती मदत घेता येणार आहे. मतदाराला संबंधित केंद्रात जाऊन आपल्या नावाची योग्य प्रभागात नोंद असल्याबाबत माहिती घेता येणार आहे.

दिवसभरात ५४ हरकती
दिवसभरात ५४ वैयक्तिक हरकती दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक प्रभाग ६ मधून १३ हरकतींची नोंद प्रशासनाकडे झाली. प्रभाग २, १०, १२ व १३ मध्ये प्रत्येकी ३ हरकती, प्रभाग ३ मध्ये ७, प्रभाग ४ मध्ये ५, प्रभाग ८ मध्ये ६, प्रभाग ११ व १५ मध्ये प्रत्येकी २ आणि प्रभाग ९, १४ व १६ मध्ये प्रत्येकी १ हरकत दाखल झाली आहे. (Ichalkaranji)दाखल झालेल्या हरकतींवर प्रत्यक्ष जागेवर जात पंचनामा केला जात असून त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे.

मतदार सहाय्यता केंद्र असे

विभागीय कार्यालय जोडलेले प्रभाग

अ) नगरपालिका (Ichalkaranji)जुनी इमारत ८, ९, १३, १६

ब) विठ्ठल रामजी शिंदे शाळा शाहू पुतळा १०, १२, १४, १५

क) सरस्वती हायस्कूल ४, ५, ११

ड) शाहूपूर गाव चावडी मागे १, २, ३, ६, ७

हेही वाचा :

पलाश मुच्छलचं आणखी एक कांड आलं समोर! आता ‘या’ महिलेसोबत

भाऊ मानल्याचं नाटक, पुणेकर महिलेचे कोल्हापूरच्या 47 वर्षीय

राज्यात पुढील २ दिवस कसं असणार हवामान? जाणून घ्या हवामान

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *