सांगलीच्या आष्टामध्ये मोठा राडा होताना दिसत आहे. (allegation)आष्टा नगरपरिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल समोर आष्टामधील बहुसंख्य नागरिक जमा झाले आहेत. आष्टा नगर परिषदेमध्ये काल झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप जमलेल्या नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. हॉल बाहेर प्रचंड मोठी गर्दी जमल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला आहे. पोलिसांकडून सुरक्षेची सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. तसेच आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.

राज्यभरात काल नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान पार पडलं.(allegation)आष्टा नगर परिषदेसाठीदेखील काल मतदान पार पडलं. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार आज मतमोजणी होणार होती. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार आता सर्व नगर परिषदांचा निकाल हा आता 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे मतमोजणी 19 दिवस पुढे ढकलली आहे. याच पार्श्वभूमीवर काल आष्टा नगर परिषदेसाठीचं मतदान पार पडल्यानंतर आष्टामधीलच विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये स्ट्राँग रुम तात्काळ तयार करण्यात आली. इथे सुरक्षितपणे ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत. तसेच एसआरपीएफसह सांगली पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आला आहे. या दरम्यान हॉलच्या समोर सकाळी अकरा वाजेपासून इथे गोंधळ बघायला मिळत आहे.

आष्टा शहर विकास आघाडी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी होती. (allegation)ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वात ही आघाडी या निवडणुकीत उभी होती. या आघाडीचे अनेक उमेदवार या ठिकाणी गर्दीसह जमले होते. त्यांनी काल रात्री जाहीर करण्यात आलेली मतदानाची आकडेवारी आणि आज ऑनलाईन जाहीर झालेली आकडेवारी यात तफावत असल्याचं म्हणत आक्षेप घेतला आहे.रात्रीची आकडेवारी आणि सकाळी जाहीर झालेली आकडेवारी यामध्ये 2 हजार मतांचा फरत दिसत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. आष्टा शहर विकास आघाडीचे वैभव शिंदे यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. या ठिकाणी 19 दिवस ईव्हीएम मशीन राहणार आहे. पण रात्री या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा चालू नव्हती, असा त्यांचा आरोप आहे.

हेही वाचा :

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात नवे धोरण लागू

केंद्र सरकारने 2026 मधील सुट्ट्यांची यादी केली जाहीर! जाणून घ्या कधी

हिवाळ्यात वाढतोय ब्रेन स्ट्रोकचा धोका; जाणून घ्या तज्ज्ञांचा खास

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *