सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडलीय.(humanity) इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आलाय. ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे यांनी मुलीला फसवून दुचाकीवरून उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला, विरोध केल्याने मारहाणही केली. अत्याचारानंतर मुलीला विवस्त्र अवस्थेत टाकून आरोपी पळाले… त्यानंतर तिने विवस्त्र अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं.. दरम्यान ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक करत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय.. या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

सांगलीच्या ईश्वरपूर येथे आठवीमध्ये शिक्षण घेणार्‍या शाळकरी मुलीवर (humanity) दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. याप्रकरणी ईश्वपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋतीक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघांना अटक केलीये. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडिता ही ईश्वरपूर येथील एका शाळेत 8 वी मध्ये शिक्षण घेते. पीडिता आईसमवेत ईश्वरपूरमध्ये राहण्यास आहे. मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋतीक महापुरे याने पीडितेला फोन करून ईश्वरपूरमधील शिराळा नाक्यावर बोलावून घेतले. त्यानंतर ऋतीक आणि आशिष या दोघांनी तिला दुचाकीवरून तुजारपूर फाट्यावरील एका उसाच्या शेतात नेले. त्या ठिकाणी दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. यावेळी विरोध केल्याने तिला मारहाणही करण्यात आली.

वाराच्या मुलाला मद्य वाहतूक करताना पकडले, (humanity) आयोगाची मोठी कारवाई अत्याचार केल्यानंतर दोघांनी तिला विवस्त्र अवस्थेत सोडून तिचे कपडे घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. यानंतर पीडिता ही विवस्त्र अवस्थेत ईश्वरपूरच्या दिशेने चालत जाताना काही जणांना निदर्शनास आली. त्यांनी तिला तातडीने कपडे दिले. याबाबत ईश्वरपूर पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी पीडितेला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडला प्रकार सांगताच हा अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्यापैकी ऋतीक हा सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तसेच त्याच्या विरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून CNG आणि PNG च्या किमती कमी होणार

नवऱ्याने मर्यादा सोडली, गर्भवती बायकोला दारु पाजली आणि नंतर मित्रांना…धक्कादायक घटना

मोठी बातमी! धनंजय मुंडे भाजपात प्रवेश करणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *