बुधवारी 3 नोव्हेंबर लॉस एंजेलिसमधील प्रसिद्ध टीसीएल चायनीज(event)थिएटरमध्ये जोनास ब्रदर्स निक जोनास, केविन जोनास आणि जो जोनास यांनी सिमेंटवर त्यांचे पाऊलखुणा कोरल्या. ही एक जुनी आणि खास हॉलिवूड परंपरा आहे जी 1927 पासून सुरू आहे. या वर्षी, जोनास ब्रदर्सना त्यांच्या बँडच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त हा सन्मान त्यांना मिळाला.प्रियांका पांढऱ्या गाऊनमध्ये, केसांचा स्टायलिश अंबाडा घालून आणि कमीत कमी दागिन्यांमध्ये खूपच सुंदर दिसत होती. निक राखाडी रंगाच्या कोट आणि मॅचिंग शर्टमध्ये डेशिंग दिसत होता. प्रियांकाची आई मधु चोप्रा देखील या आनंदाच्या प्रसंगी तिथे उपस्थित होत्या.

निक जोनासची पत्नी आणि बॉलिवूड-हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा(event) देखील या खास कार्यक्रमासाठी उपस्थित होती. तिने संपूर्ण समारंभात निक आणि त्याच्या भावांना चिअर्स केले आणि समारंभादरम्यान त्याला गोड चुंबनही दिले. दोघांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.या कार्यक्रमा दरम्यान निक जोनस पत्नी प्रियांका चोप्राला उद्देशुन म्हणाला, “माझ्या आयुष्यात इतका प्रकाश, आनंद आणि सकारात्मक दृष्टिकोन आणल्याबद्दल धन्यवाद.” भर स्टेजवर त्यांच्या दोघांमधील अतीव प्रेम पाहून चाहत्यांनासुद्धा आनंद झाला. भावनिक भाषणात निक जोनसने ‘देसी गर्ल’चे वारंवार मनापासून आभार मानले.
प्रियांका आणि निक यांचा जुलै 2018 मध्ये साखरपुडा झाला. (event)त्यांनी डिसेंबर 2018 मध्ये जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. त्यांची मुलगी मालती मेरीचा जन्म जानेवारी 2022 मध्ये झाला. अभिनेत्री प्रियांका चोप्रा लवकरच दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या तेलुगू चित्रपट ‘वाराणसी’ मध्ये दिसणार आहे. 2027 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ती दक्षिणात्य कलाकार महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत दिसणार आहे. प्रियांका हॉलिवूड चित्रपट ‘द ब्लफ’ मध्ये देखील दिसणार आहे. प्रियांका या चित्रपटात 19 व्या शतकातील महिलेची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त, प्रियांका ‘सिटाडेल’ या वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्येही झळकणार आहे.
हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद
EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा
उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील